#34. प्री-वेडिंग फोटोशूट भाग-5

दिवस पहीला:- भाग-1

विक्रम हा एक असा माणुस आहे ना, 24*7 अतिउत्साही. त्याच्यात असलेली एनर्जी, त्याचा प्रत्यय या दोन फोटोशुटच्या वेळेस आम्हा सर्वांना आला. सकाळी सगळ्यात अगोदर उठुन बाकी सर्वांना जागे करणार आणि लवकर तयारी करण्यासाठी सतत कटकट लावणार.  साधारणत: 8 वाजता आम्ही सगळं आवरुन निघालो, त्यात बाईकवर जायचं होतं तर भयाण थंडीपासुन वाचण्यासाठी जॅकेट घातले. 3-4 ड्रेस, मेक-अपच सामान, दोन-तीन चप्पल जोडी, गॉगल्स, अजुन काय काय अठवणीने बॅगेत भरलं तर होतं.

खुप प्रयत्न करुनही हवे ते लोकेशन्स काही भेटले नव्हते, आऊच्या सुचवन्यावरण पिंपरी चिंचवडला एक टेकडी होती देवीची. तिथे जायचं ठरलं ते ही रात्री ट्रायल घेताना. फोटोग्राफर पण रात्रीच आले होते आणि वाकडला लहान भावाकडे थांबले होते. मी निखीलच्या पाठी बसले आणि आऊ विक्रमच्या. असे 4 जण आम्ही हडपसरहुन निघालो.]

पुणे स्टेशन येईपर्यंत आम्ही एकमेकांसोबत होतो, नंतर विक्रम पुढे निघुन गेला आणि निखीलरावाना दुसरा रुट माहिती असल्यामुळे तिकडुन गाडी टाकली. मला जाम राग आला आणि मी बोलले ही,

“इकडुन का गाडी टाकली, विक्या त्या साईडने गेला.”

“तो लॉंग रुटने गेला आहे” निखील बोलला.

“मग त्याला तसा कॉल करुन इकडुनच बोलवुन घेतलं असतं” मी बोलले.

“अग जाऊदे, भेटु लोकेशनवरती” थोडासा इरिटेट होत बोलला.

Image result for couple fighting cartoon

मला मुड खराब करायचा नव्हता म्हणुन मी शांत राहण्याचा अटोकाट प्रयत्न करत होते. काही क्षणासाठी रात्रीचा किस्सा विसरुन मी त्याला चिडुन बोलत होते. मला भानच नव्हतं की अजुन सुट मिळाला नाहीये आणि तो मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. साहेंबाच्या मनात तो राग रात्रीपासुन दबा धरुन बसला आहे.

“तो विक्या आपल्यासाठी एवढी मर-मर करतोय मग त्याच्या सोबत थोडस लॉंग रुटने गेलं असतं तर काय बिघडलं असतं?” मी ही इरीटेड होऊन बोलली.

कारण मागे एक दोनदा असच केलं होतं, सोबत न जाता एकटं कुठुन तरी गाडी काढतो नेहमी. तो राग आणि हा राग एकत्र घेऊन मी बोलत होते. निगडीच्या आसपास ते येईपर्यंत आम्ही वाट बघत थांबलो आणि वादळापुर्वीची शांतता संपुन हे वादळ आता मला खाऊन टाकणार याचे साफ चिन्ह समोर दिसायला लागली होती.

Image result for scared girl cartoon

“आणि काय गं कटकट लावलीय नुसती, तो गेल्या चुकीच्या रुटने मग मी पण जाऊ का मागे-मागे?” तो राग बाहेर फेकत बोलला.

“मग काय झालं, सोबत अहोत ना तर जायचं कधी कधी लॉंग रुटने पण” मी ही राग आवरत बोलले.

“तुझं हे नेहमीच झालेलं आहे सुलो. एकतर तुम्हाला साधी बॅग सांभाळता येत नाही. अगोदर त्यामुळे माझं डोकं खराब झालय आणि तुझं हे वेगळचं” आता पुर्ण रागाच्या आवेशात निखीलराव बोलत होते.

तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की गरम तव्यावर विनाकारण हात ठेवला गेला आहे. आता हात भाजणार एवढं नक्की होतं. तरी मी स्वत:ला जस्टीफाय करत बोलले,

. “कुणी मुद्दाम करतं का? होतात चुका माणसाकडुन, राहीलं चुकुन. नाहीच मिळालं तर त्याचे पैसे मी देईल.”

या वाक्याचा अजुनच राग येऊन निखीलराव अजुन काही बोलणार तेवढ्यात विक्रमची बाईक दिसली. नाश्ता करायला थांबलो आणि मी त्याच्याकडे बघतच नव्हते कारण मला राग सहन होत नाही. माझा चेहरा बघुन आऊला मात्र कळुन गेलं, “ काय झालय चनी, काही बोलला का निखील?”

केवीलवाणा चेहरा करत मी तिला रिक्वेस्ट केली,

“आऊ, काहीही कर पण ते सुट शोधुन घेऊन ये प्लीज.”

यावरुन तिला समजुन गेलं होतं की आमच्यात कशामुळे वाद झाला असेल. नाश्ता करुन आम्ही लोकेशन ला पोहचलो आणि बघते तर काय, फोटोग्राफर्स हे वयाने आमच्यापेक्षा लहान. अगोदरच कॅमेर्‍यापुढे नर्व्हसपणा येतो आणि त्यात ही पोरं, वरुन मुडचे ही बारा वाजलेले. काय करावं अन काय नाही असं झालं होतं. तिथे चौकशी केल्यावर कळलं की, तो डीफेंस एरिया आहे आणि तिथे फोटोशुट ऑलाउड नाहीये. घडत असलेल्या वाईट गोष्टींच्या लाईनमध्ये अजुन एका गोष्टीची भर पडली.

शेवटी थोडा विचार करुन, जवळपास कोणता एक गार्डन असल्याच विक्याने सुचवलं आणि आम्ही सगळे तिकडे निघालो. तिथे जाऊन चेक केलं आणि थोडासा दिलासा या मनाला मिळाला. पण घड्याळ मामा आपली वाट बघत  कधीच थांबत नाही, तो पर्यंत 10.30 वाजुन गेले होते. आजच्या दिवसात कमीत-कमी दोन ते तीन लोकेशन करायचे होते. मग काय लागलो तयारीला, थोडसं मेकअप चढवुन तयारी केली. फोटोग्राफरने काय करायचं ते समजुन सांगितलं आणि पहीला शुट निखीलरावांचा होता. त्याला घेऊन शुटींग सुरु झालं एकदाचं.

निखीलराव एकदम जोशमध्ये एकाच टेकमध्ये करत होता आणि मला खुप टेक्स घ्यावे लागायचे. माझ्या चेहर्‍यावरचे भाव आणि फोटोग्राफरला आपेक्षीत असलेले भाव यात जमीन अस्मानचा फरक होता. 2,4,8 टेक्स झाले तरी काही अपेक्षेप्रमाणे होत नसल्यावर फोटोग्राफर म्हणाला,

“अहो ताई तुम्ही तिथुन जाताय आणि दादा तुमची वाट बघताय. मग तुम्ही त्याच्याकडे बघुन न बघितल्यासारखा इरिटेटींग लुक द्या आणि पुढे जा”.

माझ्या मनात हे ऐकत असताना वेगळाच विचार, “अरे भाऊ माझा होणारा नवरा आहे तो त्याला बघुन असे कसे लुक देऊ?”

तरी मनाकडे दुर्लक्ष करत मी होकारार्थी सिग्नल दिलं. मग फोटोग्राफर पुढची सिच्युवेशन सविस्तर सांगायला लागला,

“मग चालता चालताच तुम्ही पुढे एक क्षण थांबा आणि गालावर एक बोट ठेवुन दादांना या अगोदर कुठेतरी पाहीलंय अशी रियाक्शन द्या”

गालावर बोट ठेवुन ज्या प्रकारचे रियाक्शन तो द्यायला सांगत होता, त्यावरुन मला एकदम लहान मुलीसारखी फिलींग येत होती.

निखीलकडे एक अस्वस्थ लुक देऊन मी माझ्याच मनाशीच बोलले,

“हे बघ भाऊ, मेरा पहला पहला प्यार है, और उसे मै इससे ज्यादा इरिटेटींग लुक नही दे सक्ती. आयुष्यात यापेक्षा जास्त एक्सप्रेशन मला आज पर्यंत जमले नाहीत और आप हो की, मतलब कुछ भी. असच जमवुन घ्या ना आता”

पण फोटोग्राफर काही ऐकायच्या तयारीत नव्हता आणि कसबसा तो सिन मी केला. 11.30 पर्यंत एका ड्रेसवर फोटोशुट करुन नंतर चेंज केलं आणि 12 पर्यंत तिथेच शुट करुन आम्ही पुढच्या लोकेशनला निघालो. तेव्हाच आऊ आणि विक्या तुळशी बागेत निघाले.

nik

दुसरं लोकेशन पु.ल देशपांडे गार्डन होतं. तिथे पोहचण्या अगोदरच वाटेत विक्याचा कॉल आला.

“हे हे, आता पार्टी पाहीजेय मला तुझ्याकडुन” तो ओरडत पण खुश होऊन बोलला.

मला वाटलं अचानक भयानक याला काय झालं? ते विचार सोडुन मी मुद्द्याचा प्रश्न विचारला,

“सुट मिळाला का रे?”

“हो मिळाला, त्याचीच तर पार्टी मागतोय. तुझ एवढ मोठं काम केलयं” विक्या बोलला

ते ऐकुन मला केवढं रिलीफ मिळालं काय सांगु. जिवात जिव आला माझ्या. होणारा घटस्फोट निवळला आणि मी नवरीच्या वेशभुषेत स्वत:ला बघीतलं. पावलास रे देवा, म्हणत देवाचे अभार मानले.

“Thank God, तुला म्हणेल तिथे पार्टी देते विक्या  कुठे मिळाला?” मी खुश होत विचारलं.

“आऊसाठी जिथे जिन्स बघीतली होती ना तुम्ही त्याच दुकानात” विक्या बोलला.

मी ही आनंदाची बातमी गाडी चालवत असलेल्या निखीलरावांना दिली आणि त्यांच्या चेहर्‍यावर तेव्हा कुठे खरी स्माईल आली, जे बघुन मला खुप बरं वाटलं.  म्हटलं या पुढचा फोटोशुट अजुन चांगला होईल.

Related image

या घटनेनंतर एक गोष्ट कळली की, कोणत्याही अवघड, भयावह, तणावाच्या परिस्थीतीत शांत राहणं किती महत्वाचं असतं. एकदा ती गोष्ट, ती वेळ निघुन गेली की अनेक उपाय दिसायला लागतात आणि सर्व मार्ग मोकळे होतात. निखीलराव या परिस्थीतीत जसा वागला, Iam Impressed!!! त्या परिस्थीतीत येणारा तो राग, चेहर्‍यावरचे भाव, सर्वांपुढे स्वत:ला आवरणं कदाचीत मलाही शक्य नसतं झालं. पण तो एका समजतुदार व्यक्तीसारखं वागला, भलेही तो राग मी एकटी असताना माझ्यापुढे व्यक्त झाला. पण कुठे कसं वागायचं याची समज त्याच्यात खुप आहे, ही गोष्ट मनाला सुखावुन गेली.

एक खेळ संपला की दुसरा सुरु होतो, आयुष्याचा हा नियमच आहे. सर्व नॉर्मल होतय अस वाटायला लागलंच होत की, नवीन खेळ पुढे उभा होता. अतुरतेने माझी वाट बघत…….

 

Leave a comment