#35. प्री-वेडिंग फोटोशूट भाग-5

दिवस पहीला:भाग-2

garden1

पु.ल गार्डनमध्ये 11 ते 3 या दुपारच्या वेळेसच परवानगी असते, फोटोशुट करण्यासाठी. गार्डनला पोहचेपर्यंत 1.30 होऊन गेले होते आणि परमिशन काढण्यात अजुन अर्धा तास गेला. मग सुरु झाला पुढचा खेळ. आम्हाला परवानगीच दोन वाजता मिळाली आणि तयारी करुन आत जायला 2.30 झाले. गार्डनबद्दल सांगायच झालं तर, खुपच छान पध्दतीने मेंटेन केल आहे. देखरेख खुप चांगल्या प्रकारे करतात आणि तिथे येणारी पब्लीक पण अफाट असते. इतकी हिरवळ, झाडांना देण्यात आलेले वेग-वेगळे आकार, पाण्याचे झरे, बसण्यासाठी केलेले डेकोरेटीव्ह ठिकाण, एंट्री पॉईंट सर्वच एकदम ऑसम पध्दतीने बनवलेले आणि टिकवलेले आहे.

आम्हाला 15 मिनीटे शॉर्ट ड्रेसवर फोटोशुट करुन ड्रेस चेंज करायचा होता, तो पर्यंत 2.50 होऊन गेले होते. लहान भाऊ, सोपान तिथे होता त्याच्या पुढे शॉर्ट ड्रेसमध्ये यायला फार लाज वाटत होती. कारण त्याला आवडत नाही हे मी चांगलच जाणुन होते. तिथे बघुन शांत बसला खरा, पण नंतर विक्याला म्हणाला, “काय गरज होती शॉर्ट ड्रेसवर फोटोशुट करायची? दुसर्‍यांनी केलं म्हणुन आपण पण करायच का?”

“अहो मामा, घालु द्या की तिला आवडत असेल तर काय होतय बरं?” समजवण्याच्या सुरात विक्या बोलला

हे संभाषण मला नंतर तो गेल्यावर समजलं. गार्डनमध्ये शुट करायला आम्हाला वाटलं हो-नाही करत आर्धा तास मागे पुढे परवानगी मिळेलच. म्हणुन दुसरा ड्रेस (तो महागडा घेरेदार लॉंग गाऊन) घालुन यायलाच 15 मिनीटे लागली. निखीलरावांनी हरवुन सापडलेला तो थ्री-पीस सुट घातला होता. आम्ही तयारी करुन आत जातो न जातो, शिपाई आला आणि सगळ्यांना बाहेर हाकलुन द्यायला लागला,

“चलो निकलो इधरसे, टाईम खतम हो गया”

“आहो काका, प्लीज फक्त 10 मिनीटे, फोटोशुट करु द्या ना” आम्ही विनंती करत बोललो.

“फोटोशुटची वेळ 11 ते 3 आहे. तुम्ही त्या वेळेत यायला पाहीजे” काका नियम सांगत बोलले.

“हो काका, पण ट्रॅफीक माहितीच आहे तुम्हाला. म्हणुन उशीर झाला आम्हाला, काका प्लीज करु द्या हो” विक्या म्हणाला.

“नाही जमणार बाबा, आमची नौकरी जाईल याच्यामुळे. तुम्ही निघा आता आणि उद्या या” काका बोलले.

Image result for girl requesting cartoon

पण काका काही ऐकायच्या सुरात दिसत नव्हते, विक्याने त्यांच्या हातावर पैसे टेकवण्याचा पण प्रयत्न केला. पण काका इमानदार कॅटॅगिरीतले निघाले आणि आम्हालाच खुप खडसावलं. मग काय हिरमुसल्या चेहर्‍याने आम्ही बाहेरच थांबलो, काय माहिती आमची दया येऊन आम्हाला थोडावेळ परवानगी देतील या भाबड्या आशेवर. पण वेळ खराबच होती म्हणा आमची, असं काहीच घडलं नाही आणि काका त्यांच्या ठाम मतावर, तिथल्या बाकावर बसुन होते. आमच्या सारखे अजुन बरेच जोडपे तिथे फोटोशुटसाठी आलेले होते, सर्वांना हकलुन  देऊन काका मजा बघत बसले होते. शेवटी कंटाळुन आम्ही बाहेरच फोटोशुट केला थोडासा आणि तिथुन निघालो ते घरी जाण्यासाठीच.

सकाळपासुन काही न खाता आम्ही भटकत होतो, म्हणजे नाश्ता तेवढा केलेला. ड्रॆस चेंज न करता मगरपट्याच्या हॉटेलमध्ये 5 वाजे पर्यंत पोहचलो. बघतो तर काय तिथे पण जेवण म्हणुन काहीच नव्हतं त्यावेळेला. मग सरतेशेवटी, पावभाजी, दोसा, उथ्थप्पा अशा गोष्टीवर ताव मारुन आम्ही तिथुन 6 वाजता निघालो. दादाच्या सोसायटीमध्ये स्विमींगपुल आणि मस्त गार्डन होतं. बंधुने तिथे फोटोशुट केल्यामुळे आम्ही ते टाळत होतो. तसा आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही तिथेच फोटोशुट करायचं ठरवलं. त्यांनी गार्डनचा भाग वापरला होता, आपण स्विमींग पुलचा वापरु असं सांगत विक्याने सगळी तयारी केली. साधारणत: रात्री 9 वाजेपर्यंत फोटोशुट केला, आणि खुपच मस्त फोटोशुट झाला.. त्यामुळे दिवस भर चांगला न झालेल्य़ा फोटोशुटची कसर भरुन निघाली.

जाम थक़लेलं शरीर, कधी एकदाच बेडवर पडेल असं झालं होतं. मुलं सर्वजण बाहेर गेली जेवायला आणि आम्ही घरी जेवण करुन उद्यासाठीची बॅग पॅक केली. सगळं सामान आठवणीने भरण्याचा प्रयत्न केला आणि दुसर्‍या दिवशी लोणावळा जायचं होतं. सो लवकर निघावं लागणार होतं आणि त्यासाठी खुप लवकर उठावं ही लागणार होतं. म्हणुन मी पटकन निद्राधीन झाले.  सुट मिळाल्याच्या आनदांने समाधानी आणि सुखी झोप लागणार होती एवढ नक्की होतं.

आठवणी साठवताना मिळालेले हे अनुभव आणि या अनुभवात निखीलचा कळणारा स्वभाव. सगळंच काही ना काही शिकवुन जातं होतं, इतक्या दिवसापासुन चालु असलेल्या झटपटीचा उद्याचा शेवटचा दिवस बाकी होता. तो तरी साधा, सरळ आणि निवांत जाऊ दे, अशी देव न ऐकणारी प्रार्थना करुन मी निद्राधीन झाले.

Image result for girl praying to god cartoon

Leave a comment