#36. प्री-वेडिंग फोटोशूट भाग-6

Related image

दुसर्‍या दिवशीही पहाटे 4 वाजताच विक्या उठवायला आला,

“अगं उठ, किती वाजलेत बघं, लोणावळा जायचं आहे आपल्याला”

डोळे उघडण्याचा प्रयत्न करत म्हणाले, “अजुन पाच मिनीटे झोपु दे ना प्लीज.”

“अगं म्हशे काही वाटतयं का तुला, तिथे जाऊन सनराईज घ्यायचायं आपल्याला आणि तु इथे झोपा काढतेय. उठं पटकन, नाहीतर पाणी आणुन टाकतो बघ आता” विक्या वॉर्नींग देत म्हणाला.

“काय रे तु, झोपु पण देत नाहीस. किती मस्त स्वप्न पडतं होतं, झोपु दे ना 2 मिनीटं अजुन” त्याच्यावर चिडत मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत बोलले.

पण तो कसला ऐकतोय, शेवटी सर्वांना उठवलं आणि लागले सगळे तयारीला. 5.30  वाजे पर्यंत सगळी तयारी करुन निघालो ते निखीलच्या मित्राकडे. उठल्यापासुन निखील त्याला फोन करत होता,पण भाऊ काही केल्या फोन घेईनाच. सर्वांना जाम टेंशन आलं, कारण आम्ही त्याच्या मित्राचीच गाडी घेऊन जाणार होतो. शेवटी कॉल करत करत त्याच्या घराकडे निघालो, पुण्यातील पाहटेचा शांत रस्ता, गुलाबी थंडी आणि काही पहाटे उठणार्‍या कामगारांची हालचाल बघत बघत पोहचलो आम्ही. तिथे जाऊनही आर्धा तास वेट करावा लागला, तेव्हा जाऊन त्याचा मित्र गाडीसह आला.

मग वाकड चौकात जाऊन फोटोग्राफर्संना कॉल करुन रस्ता सांगावा लागला, जो त्यांना सापडतच नव्हता. एका टपरीवर चहा घेऊन निघे तो पर्यंत 6.30 वाजुन गेले होते. ज्या वेळेत आम्हाला लोणावळा गाठायचा होता, आम्ही अजुन पुण्यातच रेंगाळत होतो. शेवटी निघालो आणि मग फ़ोटोशुटचा दुसरा आणि शेवटचा दिवस सुरु झाला.

Image result for irritated girl cartoon

माझ्या आयुष्यात सहजरित्या कुठली गोष्ट घडलीय का? त्यामुळे मी आणि इतर लोकांनी आजचा दिवस व्यवस्थीत फोटोशुट होईल आणि सगळं सुरळीत होईल याची अपेक्षा करणचं चुकीचं होतं. 7.45 च्या आसपास आम्ही लोणावळ्याच्या एका स्पॉटला पोहचलो. जिथे आम्हाला सुर्योदय घ्यायचा होता, पण ढगाने सुर्य अडवुन धरलेलं. त्यात उशीर झाल्याने सुर्योदय मिळतो की नाही याची शंका होती. मग सगळे फटाफट उतरलो, आता चेंज कुठे करायचं? यासाठी इकडे-तिकडे शोधा शोध सुरु झाली, एका ठिकाणी कसलं तरी गोडाऊन होतं. तिथे करता येईल या आशेने विक्या धावतच गेला, पण निराशा हाती घेऊन परत आला. मग जवळच एक हॉटेल होतं, हॉटेलवाल्याच्या हातात काही पैसे टेकवुन आम्ही ड्रेस चेंज करायला धावलो.

वॉशरुम तसा ठिक होता, म्हणजे जास्त घाण ही नाही आणि स्वच्छ ही नाही. पण करणं तर होतच, म्हणुन गप्पगुमानं बॅग उलथा-पालथ करत नेव्ही ब्ल्यु कलरचा वन पीस काढला. पण वन पीस ट्रांसपरंट असल्याने स्लॅक्स घालावी लागणार होती, जी काही केल्या सापडत नव्हती.

“आवडी, बघ ना यार स्लॅक्स कुठे गेली. सापडतच नाहीये आणि तिच्याशिवाय हा ड्रेस घालता पण येणार नाही.” मी कंटाळुन आऊला म्हणाले.

आऊने पण सगळं चेक करुन पाहीलं आणि मी स्लॅक्स घेऊनच आली नसेल असं मला सांगत दुसरा ड्रेस घालण्याचं सजेशन दिलं. पण मला घालायचा तोच ड्रेस होता, म्हणुन मी आडुन होते, पण स्लॅक्स नसल्यामुळे सरतेशेवटी एक लॉंग गाऊन टाईप वन पीस मी घातला. हलका हलका मेक-अप चढवुन, धावत धावतच गेले. जाते तर काय इतकी हवा होती की बास, मीच उडुन जाईल की काय याची भिती वाटावी अशी. मी आऊ कडे बघुन हसले आणि हळुच आवाजात म्हणाले, “शॉर्ट वन पीस घातला असता तर काही खरं नव्हतं आवडे” यावर दोघीजणी हसायला लागलो(कधी कधी आयुष्यात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे त्या क्षणाला मला ते पटलं).

Related imageImage result for girl in wind cartoon

 

मग बराच वेळ वेगळ्यावेगळ्या पोजेस देऊन झाल्यावर, फोटोग्राफरने ड्रोनने शुटींग करायला सुरुवात केली. 5 मिनीटे ड्रोन उडतो न उडतोच रोडवरुन एक फोर व्हीलर जाता-जाताच थांबली आणि आम्हाला बोलवणं धाडलं. आधीच उशीर झालेला असल्याने आम्ही वैतागुनच त्याच्याकडे पाहीलं. त्याने हळुवार काच खाली करुन आमच्याकडे पाहीलं तेव्हा आमची सगळ्यांची टरकली, कारण तो होता एक पोलीसमामा!!!

Image result for indian police cartoon

“काय रे? परवानगी घेतलीय का ड्रोन वापरायची?” पोलीसमामा कणखर आवाजात म्हणाले.

“नाही सर, जस्ट आताच उडवला हो थोडावेळ” फोटोग्राफर घाबरल्याचा आव आणत म्हणाला

“माहिती नाहीये का तुम्हाला या भागात ड्रोन उडवण्यावर बंदी आहे ते?” लागलीच पोलीसमामाने दुसरा प्रश्न टाकला.

“काय हो काका, जाऊ द्या ना आता, माहिती नव्हतं आम्हाला” एक फोटोग्राफर म्हणाला.

त्याच्या बोलण्याला आम्ही सिरीयस्ली घेत नाही हे लक्षात आल्यावर, पोलीसमामांनी दम द्यायला सुरुवात केली. नाव, गाव, विचारुन लिहुन घेतलं. पोलीस ठाण्यात तक्रार करतो आणि अजुन काही बाही बोलायला लागला. काही केल्या तो पोलीसमामा जायचं नावच घेईना. आम्ही दुर उभं राहुन सगळा खेळ बघत होतो. शेवटी निखीलचा मित्र आणि निखीलरावांनी जाऊन काय ती समजुत काढली आणि पोलीसमामा दम देऊन निघुन गेले. तो पर्यंत आमचा अमुल्य एक तास त्यांनी खाल्ला होता आणि आमचा मुडपण. फोटोग्राफर पण आता घाबरलेच होते, मग त्या लोकेशनला आता शुट न करता आणि ड्रोन वापरायला काढायचाच नाही हे ठरवुन पुढे निघालो.

मध्येच रस्त्यावर थांबुन परत फोटोशुट केला आणि मग लोणावळ्यात जाऊन रेसॉर्टवरती करायचं ठरवलं. तो पर्यंत 12 वाजुन गेले होते आणि आमच्या पोटात, कावळा, उंदीर सगळेच जंगली प्राणी भुकेने व्याकुळ होऊन उड्या मारायला लागले. जवळपास कुठे हॉटेल ही दिसेना, शेवटी एक टपरी कम हॉटेल दिसलं. निदान हलकं-पुलकं काहीतरी खायला भेटेल या आशेने थांबलो तिथे.

पण कसलं काय, वेफर्स शिवाय दुसरं काहीच हाती नाही लागलं. तिथुन मग लोणावळ्याच्या एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आणि ते हॉटेल मात्र एकदम मस्त होतं.

मस्त वेगवेगळ्या व्यंजनावर सर्वांनी ताव मारली. जेवता-जेवताच कल्पना सुचली की, रिसॉर्टपेक्षा या हॉटेलवरच फोटोशुट चांगला होईल आणि हॉटेल मालकाची परवानगी घेऊन आम्ही तिथेच फोटोशुट केला. उलट सर्वात चांगला शुट त्या हॉटेलवरच झाला आणि आम्ही 3-4 च्या सुमारास तिथुन परत पुण्याला निघालो. संध्याकाळी 5-6 वाजता पुण्यात टच झालो आणि एका चहा टपरीवर चहा घेऊन घरी निघालो हडपसरला. फोटोग्राफर ही समाधानी नव्हता, त्याच्याप्रमाणे हवा तसा फोटोशुट झाला नव्हता. परत घरी जाऊन ड्रेस चेंज केला आणि रात्री 9 वाजे पर्यंत तिथे शुटींग केलं. फोटोग्राफरने मस्त आइडीया करुन छान ऍंगलने फोटोज काढले.(लोणावळा स्पॉटला काढलेले काही फोटोज)

 

तरी शुट व्यवस्थीत न झाल्याने फोटोग्राफर नाखुश असल्याचे समजलं.  आम्हाला परत कधी फोटोशुट करता येईल का? असं तो विचारत होता. आता फक्त दिड महिना राहीला होता लग्नाला आणि बर्‍याच गोष्टी करायच्या बाकी होत्या. सो आम्ही त्यावर विचार करुन कुठला विकेंड फ्री भेटला तर सांगतो असं त्याला सांगुन रवाना केलं. सरतेशेवटी एकदाचा संपला फोटोशुट आणि माझ्यासहित सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

या फोटोशुटमध्ये सर्वानी खुप मदत केली, वहीनी,दादा,सोपान, ऑल टाईम उत्साहीत प्राणी विक्या, आऊ, या सर्वांचे मनापासुन आभार. सर्वांना अनेक शॉक बसले आणि त्यांनी शॉक समेत मला ही सहन केलं यामुळे मंडळ फार आभारी आहे. ही साथ अशीच राहु द्या आणि मला सहन करण्यासाठी देव तुम्हाला आपार सहन शक्ती देवो हीच इश्वर चरणी प्रार्थना करुन या ब्लॉगचा दि एण्ड करते.

Image result for girl thanking cartoon

येणारी नवीन ब्लॉग सिरीज पण अशीच सर्वांना अवडेल अशी आशा करतेय.

Leave a comment