Blog

#73. श्रध्दांजली

 

आयुष्य किती क्षण भंगुर आहे हे दिवसेंदिवस कळत आहे. पण एकदम जवळून कधी जाणवलंच नव्हतं आजपर्यंत. ईदचा तो दिवस, हसती खेळती माझी काकू, जिला आम्ही तई म्हणून हाक मारायचो. ती काळाच्या पडद्याआड झाली. या निर्दयी काळाने तिच्यावर अकाली झडप मारून तीेला आमच्यापासून कायमचं दुर घेऊन गेला. 

Screenshot_20200525-192803__01

दुपारी दोनच्या सुमारास भावाचा फोन आला, “तईला अड्मिट केलंय कल्याणला आणि क्रिटिकल हाय म्हण तब्येत.” बंधू
हे ऐकुन मी जवळपास ओरडलेच, “अरे हे काय म्हणतोय तू? आणि अचानक असं काय झालं?”
“कालच तर व्हिडिओ कॉल सुरू असताना तिचा आणि आईचा हसत संवाद ऐकला होता” मी भरल्या डोळ्यांनी बंधुला विचारलं.

“काय माहिती गं, मला पण तोच धक्का लागलाय. समजत नाहीये काय झालंय, सगळेजण निघालेत तिकडेच हॉस्पिटलला” बंधू.

त्याचा फोन ठेवला आणि हात जोडून देवाला प्रार्थना केली, “देवा काही ही कर पण तईला बरं कर. तू असा एवढा मोठा घात आमच्यासोबत करूच शकत नाहीस.”

मन काही केल्या लागत नव्हतं, सर्व कॉल्स , सर्व संवाद नको त्याचं दिशेला जात होते आणि दोन तासानंतर आयुष्यात कधी ऐकेलं असं वाटलं नव्हतं, तीच खबर कानावर आणि मनावर आदळत होती. डोळ्यातून अश्रु धारा आपोआपच व्हायला लागल्या. मी अजुनही देवाला विनवणी करत होते,

“तिला बरं कर, हे जे ऐकलंय ते खोटं निघू दे.”

“तू देव आहेस ना, मग काही चमत्कार दाखव. देवा प्लीज तिला परत पाठव आमच्याकडे प्लीज”.
“त्या पोरांच्या चेहऱ्याकडे बघ, त्यांना असं पोरकं करायचा जीव तरी कसा होतोय तुझा?”

मन तीन महिन्यापूर्वी झालेल्या आणि शेवटच्या ठरलेल्या भेटीत हरवून गेलं.

IMG-20200526-WA0002__01

“आयी, ये गं सुलू आल्यापासून घरच्या बाहेर नाहीस बघं” तई म्हणाली.

“नाहीये तई, प्रवास करून थकले होते. मग जरा झोप काढले, म्हणून आले नाही बाहेर” मी.

“ये मग, चा(चहा) पिलीस का? चा करते मी ये” तई.

“होय, येते थांब ब्रश करून” मी.
हा संवाद तईचा मी गेल्यावर नेहमी ठरलेलाच असायचा. मी घरी गेल्यावर तई चहा करायची आणि चुली समोर बसून मी प्यायचे. मीच काय घरातले कोणतेही बहीण-भावंडं, जावई, नंदा, चुलते, कोणताही पै-पाहुणा येऊ देत तिच्याकडून बोलावणं असायचचं. बऱ्याच वेळा ती भाकरी करत असायची आणि मला चुलीवरची भाकरी नेहमीच आवडती असल्याने, मी त्यावर ताव मारायला विसरायचे नाही. गरम गरम भाकरी आणि भाजी विक्या सोबत बसून यावेळेस ही खाल्ली होती.

“एक एक गोष्ट ऐकना बग सूलु, नुसतं सतवतय बग ह्यनं” तई मोठा मुलगा विक्याची तक्रार करत म्हणाली.

“काय रे त्रास देताव उगाच, कळत नाही का विक्या?” मी विक्याला समजावत म्हणाले.

“अगं सारखं भाजी हीच काबर केलीस? ते तसच काबर केलीस? नुसतं जीव खावाव का माणसाने? एकतर काम करून जीव पुरे पुरे झालय” तई

” एकदा मी मरून गेल्यावर ह्यला कळतंय बघ तू” चिडून ती बडबड करायची आणि आमच्या घरातल्या प्रत्येक बायकांचं हे वाक्य ठरलेलं आहेच. चिडून राग व्यक्त करण्याची ही एक पध्दत.

“आयी असं का म्हणलालीस म्हणते, त्याची बायको आल्यावर बघ की बायकोला असच करतो का?”

” आपण इथच बसून बघायचं सगळे, असलं मरायचं कशाला बोलतीस बरं उगाच”मी म्हणाले.

त्यानंतर रात्री काढलेलं ताजं गायीचं दूध, एक ग्लास भरून प्यायला दिलं. शेतावरून आणलेलं, ऊस सोबत बसून खाल्लं. हुरडा खात जुन्या घरच्या कट्टयावर बसून, आम्ही कितीतरी गप्पा मारल्या. ते फेब्रुवारी महिन्याचे ५ दिवस तिच्यासोबतचे शेवटचे ठरतील, अस स्वप्नातही वाटलं नव्हतं.

आमचं घर आणि घरातले मंडळी संख्येने खूप जास्त. त्यात प्रत्येकाचे नातलग ही तेवढेच वाढलेले, नाती गोंतीचा जणू जंगल आज्जीने पसरवून ठेवलेला आहे. मी १ वर्षाची असताना माझी मोठी आई म्हणजेच मोठी चुलती देवाघरी गेली. आम्ही खूप लहान असल्याने तो धक्का आम्हाला लागला नसावा आणि काळानुरूप लवकर ते दुःख विसरून ही गेलो. त्यानंतर तब्बल २८ ते २९ वर्ष असं अकाली कुणी गेलंच नाही. जे गेले ते वयस्क होते, आईचे आई-वडील, बाबाचे आई-वडील,काकुचे आई-वडील हे सर्व वय झाल्यानंतर काळा आड झाले. त्यांचं दुःख व्हायचं पण ते अख्खं आयुष्य जगून गेले याचं समाधान ही असायचं.

Screenshot_20200606-173332

फोनवर फोन, सर्वजण रडत होते. हा एवढा मोठा आघात कोणालाच सहन होत नव्हता. लॉकडाऊनमध्ये आम्ही सर्वजण अडकलो होतो, ते ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. इतकं हतबल कधीचं जाणवलं नव्हतं आयुष्यात, तईची एकुलती एक मुलगी ही पुण्यात आडकली होती. तीच्या जवळ असणं किती महत्वाचं होतं, तिला रडताना खांदा देणं किती महत्वाचं होतं. पण काहीच करता येत नव्हतं, अगदी काहीच नाही.

या कोरोना मुळे तिला आईचं अंत्यदर्शन ही व्हिडिओ कॉलिंगवर घ्यावं लागलं. याच्यापेक्षा विचित्र आणि वाईट आयुष्यात काय घडू शकतं? ती गेली दुसऱ्या दिवशी घरी, शेवटी न बघितलेल्या आईला तिची नजर शोधत होती. तिला या गोष्टीचा स्वीकारच नव्हता होतं की, तिला न भेटता तिची मम्मी निघून जाईल. तिला तसं बघून घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं हृदय पिळवटून निघत होतं. कोण समजवणार? आणि काय समजवणार? जे नुकसान झालंय, जे हरवलंय, त्याची भरपायी कशानेच होणारी नव्हती हे सगळे जाणुन होते.

त्यांची १९९० दशकातील लव्हस्टोरी होती, आम्ही चिडवायला लागलो की किती लाजायचे दोघेजण. घरी नवरी बनून आली, ३० वर्ष घरात संसार केला, अनेक नाती जोडली, ती जोडताना अनेक वेळा भांडण झालं असेल. कितीतरी वेळा आज्जीचा मार खाल्ला असेल (माझी आई आणि तई दोघी खूप मार खायच्या), मुला बाळासाठी किती राबला असेल तिचा जीव, दोघांनी मिळून सोन्यासारखा उभा केलेला संसार, पण तिला निघावं लागलं अर्ध्यावर सोडून. पण तीच्याविणा तो संसार चालेल तरी कसा?

Screenshot_20200528-162851__01

किती ही काम असलं तरी नवऱ्याचा डब्बा पोहच करणारी ती. शेताचा, घराचा ७०% टक्के भार उचलणारी ती. कुठलाही कार्यक्रम असो हसऱ्या चेहऱ्याने त्यात उत्साहाने सहभाग घेणारी ती . राब राबणारा तिचा आत्मा, नवऱ्यासाठी, मुलासाठी चिंतेने व्याकुळ होणारा आत्मा, आम्हा सर्वांशी नेहमीच हसून बोलणारा आत्मा, कधी त्रासुन, चिडून रागाने ओरडणारा तिचा आत्मा, आपल्याचं संसाराकडे बघून सुखाने हसणारा तो आत्मा अनंतात विलीन झाला.. आई, काकू, भावजय,  जाऊबाई, नंदा, आत्या, मामी, अशा कितीतरी नात्यांना अर्धवट सोडून ती चालती झाली. आज ही सर्व जोडलेली नाती डोळ्यात अश्रू घेऊन तिला शोधताय, तिच्यासोबत जगलेल्या प्रत्येक क्षणात तिचं अस्तित्व शोधताय. पण ती कधीच न दिसणाऱ्या, कधीच न परतणाऱ्या प्रवासाला निघून गेलीय.

IMG-20200604-WA0039

तिचा आत्मा कुठे जवळपास असेल, आम्हाला दुरून नक्कीच बघत असेल. तिला एकच सांगायचं आहे,
“आता तू निवांत हो, विश्रांती घे. सतत ३० वर्ष राबलेल्या त्या आत्म्याला विश्रांती दे”.

” तुझं जाणं एक रितेपण देऊन गेलय कायमसाठी, तुझी जागा कुणीच घेऊ शकणार नाही, कुणीच नाही.”

“तुझं हसणं, तुझी स्वप्नं, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा जपण्याचं, पुर्ण करण्याचं काम तुझी पाखरं करतील.”

“तू निवांत हो, आमच्या डोक्यावर  तुझ्या आशीर्वादाचा हात सदैव असू दे.”

“तुझ्या जोडलेल्या सर्व नात्याकडून भरलेल्या आसवांनी, जड झालेल्या अंतःकरणाने तुला भावपूर्ण श्रध्दांजली”..

Screenshot_20200606-135808

 

#72.कश्मीर-पश्चातापाची भुमी

भाग-2

10 Interesting Facts About The Kashmir Valley - SOTC Holidays

कोणत्या तरी कारणास्तव निखीलरावानचं कश्मीर कादंबरी पुर्ण वाचुन नव्हती झाली. त्यात माझे काही भाग वाचुन झाल्यावर मी त्याला म्हणाले, “कादंबरी तर चांगली आहे की, तुला का नाही आवडली?”

“काही नाही गं, पुढे फार बोरं मारलयं लेखकाने. त्यात तो ही मुसलमानच आहे, मग तो त्यांच्याचं बाजुने लिहीणारं ना?” निखील बोलला.

Cartoon Computer Icons Drawing Woman - Girl Thinking Clipart Gif ...

हे वाक्य ऐकुन माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झाला, ‘खरचं तसं असेल का?’

‘लेखकाने खरचं एका बाजुने त्यांचा दृष्टीकोन मांडला असेल का?’

‘त्यांना ही दगडफेक करणारे आणि बंड पुकारणारे लोकं चांगले वाटत असतील का?’

असे एक सोडुन अनेक प्रश्न मनात घर करत होते. पुढे वाचु की नको? हा ही एक प्रश्न मनात चमकुन गेला. पण तरी न वाचता, स्वत: न जाणता, कोणत्या लेखकाच्या धर्मावरुन, त्यांच्या नावावरुन त्यांच्या विचाराचं अवलोकन करणं मला काही पटत नव्हतं. मी वाचन सुरु ठेवलं, त्यात कश्मीरला लाभलेलं सांस्कृतीक वारसा, मलबेरी लिव्ह्स, सिल्क सारी, शॉल्स, केसर अशा बर्‍याच गोष्टींचे विश्लेषण लेखकांनी केलेले आहेत.

Shopping In Srinagar | Places To Shop in Srinagar | What To Shop ...Tracing the famous different flavors of best Kashmir spices

 

Red Pashmina Kashmiri Silk Embroidered Stole Manufacturer in ...Traditional Dresses of Jammu & Kashmir – Clothing of Kashmir | Wikinow

मुफ्ती सय्यद त्यावेळेचे गृहमंत्री होते, त्यांच्या मुलींचे अतिरेक्यांकडुन अपहरण करण्यात आलं. या घटनेबद्दल आपण सर्वजण थोडंबहुत जाणुन आहोतच, त्यावेळेस ग्राऊंड लेव्हलला काम सांभाळणारे हे लेखक मुख्य सचिव म्हणुन कार्यरत होते. त्यांनी केलेले एक न एक प्रयत्न त्यांच्याचं शब्दात सांगण्याचा यत्न केला आहे. जेव्हा मुसा रझा यानी अपहरणाची खबर स्वत: जाऊन  गृहमंत्र्याला दिली, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघुन ते थोडेसे चकीतच झाले. स्वत:ची मुलगी धोक्यात आहे, हे कळुनसुध्दा एक बाप कसाकाय एवढा शांत असु शकतो? हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. अतिरेकी हे वेळोवेळी त्यांची मागणी बदलत होते, याच्यावरुन ही किडनॅपींग कुठल्या ठोस कारणासाठी आणि कोणत्या मोठ्या अतिरेकी संघंटनेद्वारे नव्हती झाली हे मुसा रझा यांच्या लक्षात आलं.

The Kidnapping of Rubaiya Sayeed: A Turning Point in Kashmiri ...

कैदेत असलेल्या मोस्ट वॉंटेड अतंकवादीना मुक्त करुन, रुबैय्याला सोडवणं फारुख अब्दुल्ला यांना ही मान्य नव्हतं. आता जर ही मागणी मान्य केली तर, भविष्यात या गोष्टी वारंवार होतील हे त्यांना ठावुक होतं आणि भविष्यात झालं ही तसचं. मुसा रझा यांनी स्वत:चा जिव धोक्यात घालुन त्यांना भेटण्याचा प्रत्यक्षात प्रयत्न केला आणि भेटुन त्यांचं मन वळविण्याचं कामही केलं होतं. सरकारकडुन काहीचं न घेता, रुबैय्या सय्यदला सोडण्यात येणार होतं. फक्त 1987 च्या इलेक्शन चालु असताना झालेल्या आन्यायाची जाहीर माफी मागावी आणि परत चौकशी करुन योग्य तो न्याय व्हावा अशी मिलीटंट्सची मागणी होती. ती मागणी मान्य करुन मुसा रझा यांनी जवळपास प्रॉब्लेम सोडवलाच होता.  परंतु तेवढ्यात केंद्र सरकारच्या पंतप्रधान दालनातुन फोन येतो,

“काहीही करुन 5 आतंकवाद्यांना मुक्त करुन त्यांच्या हवाली करा आणि रुबैय्या सय्यदला सोडवुन घ्या”

मुसा रझा यांना जवळपास ते आदेशच मिळाले होते, त्यांच्या लक्षात येत नव्हतं असं करण्यामागचं कारण काय असेल? जे काम सहहजरित्या होत होतं, मग अतंकवाद्यांना सोडण्याचे आदेश का? शेवटी मिडीया, केंद्र सरकार यांच्या दबावाखाली 5 आतंकवादी सोडुन तिची मुक्तता करण्यात आली. सुटका झाल्यावर रुबैय्या सय्यदला भेटण्याची, तिला कुणी किडनॅप केलं होतं? कुठे ठेवलं होतं? कुणी ओळखीचं होतं का? अशी चौकशी करायची संधी मुसा रझा यांना दिलीच नाही. तिला मिडीयापुढे ही येऊ दिलं नव्हतं, यातुन ही लेखकाला कळुन जातं की हे साधा विषय नव्हता. खुप वर्षानंतर जेव्हा कॅबीनेट सचिवाला भेटुन मुसा रझा यांनी विचारलं, “तुम्ही त्या दिवशी असा अचानक आदेश कम अल्टीमेटम का दिलं होतं? काय कारण होतं नेमकं?”

तेव्हा कॅबीनेट सचीव म्हणतात, “मुसा हा गेम खुप मोठा होता, टार्गेट त्याच्यापेक्षाही मोठं होतं.” यावरचं त्यांनी संभाषण संपवलं. शेवटपर्यंत लेखकाला त्याबद्दल सत्य कळलं नसल्याचं तरी कादंबरीमध्ये नमुद आहे. कदाचीत कळलं असेलही, पण त्यांनी जाणुन उघड करण्याचं टाळलं असेल असचं वाटतं. म्हणजे त्याकाळात देशाचे गृहमंत्रीचं त्यात सामील तर नव्हते ना? असा प्रश्न पडतो किंबहुना खात्रीचं वाटते.

Jinnah's Kashmir Controversy (I)Hari Singh - Wikipedia

लेखकांनी कश्मीर प्रश्न एवढा मोठा आणि किचकट होण्यामागे जबाबदार असलेल्या 4 व्यक्तींची नावे उघडपणे सांगितली आहेत. 1. माऊंट बॅटन 2. राजा हरी सिंग 3. पंडीत नेहरु 4. मोहम्मद अली जिन्नाह या चार व्यक्तीमुळेच कश्मीरचा एवढा मोठा यक्ष प्रश्न आज जगापुढे, भारतापुढे उभा आहे. त्याच्यावर उपाय कधी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्याकाळात जम्मु कश्मीरचे पंतप्रधान शेख अब्दुल्लाह होते, त्यांची कार्यशैली खुप चांगली असल्याचे लेखकाचे मत आहे. परंतु नेहरुंच्या काही राजकरणामुळे त्यांना बाजुला सारण्याचे काम केले आणि त्यांना तब्बल 15 वर्ष नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याकाळात भ्रष्टाचार, कश्मीरी जनतेवर अत्याच्यार, विकास कामे करण्यावर भर देण्यात आले नसल्याचे लेखकांनी नमुद केलं आहे.

शेवटी शेवटी लेखकाने काही पॅरामध्ये भारतीय मुस्लीमांवर अत्याच्यार होत असल्याच्या आशयाचे लिखाण केले आहे, जे मला तरी योग्य वाटत नाही. उदा. गोहत्या सारख्या लहान कारणामुळे जिवे मारणे, आयोध्या इथे राम मंदीर बांधकामाची मागणी, केंद्र सरकारचा मुस्लीमांच्या धार्मीक कायद्यात लुडबुड करणे, जमावाने मुस्लीमांना ठार मारण्याचे प्रकार, वेगवेगळ्या मुस्लीम नाव असलेल्या ठिकाणाचे नामांतर  करणे, ताज महलच नामकरण करण्याची मागणी (जे मी पहील्यांदाचं वाचलं, अशी मागणी कुणी केल्याचं मला तरी आठवतं नाही)     अशा अनेक गोष्टीने भारतातील मुस्लीम त्रस्त आणि व्यस्त आहेत. त्यामुळे ते कश्मीरच्या मुस्लीमकडे लक्ष देत नाहीत असं त्यांचं मत आणि लिखाण आहे.

परंतु वरच्या बर्‍याच गोष्टी मला साफ चुकीच्या वाटतात. गोहत्या ही चुकीची आहे ते थांबवणं गरजेचचं आहेच, कायदे  धर्माशी संबंधीत असले तरी, चुकीचे कायदे बदलणे ही काळाची गरज असते. आयोध्या राम मंदीरचा निर्णय होणं ही तितकचं महत्वाचं आहे. मग त्यात मुस्लीम लोकांविरुध्द निर्णय होताय अशा अशयाची टिप्पणी लेखकाने का केली असेल? कळत नाही. लेखकाच्या मते आर्टीकल 370 आणि 35 अ याला सरकारने हात लावु नये, कारण जम्मु आणि कश्मीरच्या जनतेला ते कवच सारखं संरक्षण वाटतं. परंतु सरकारने ते आजच्या घडीला कायमचं रद्द करुन टाकलेलं आहे आणि लेखकाचं 2016 चं हे मत आहे.

लेखकांनी काही उपाय ही कादंबरीच्या शेवटच्या भागात सुचवलेले आहेत, त्यात सरकारनी बरेचं उपाय स्विकारुन त्यावर काम करण्यास सुरुवात केल्याचेही ते सांगतात. कश्मीर, पाकीस्तान आणि भारत यावर बरेच उघड भाष्य लेखकांनी केलेले आहे. बर्‍याचं कश्मीरी नेत्यांशी भेट त्यांनी नुकतीच केलेली होती, त्यात अनेक नेत्यांनी मोदीवर विश्वास दाखवल्याचं त्यांच्या लिखाणातुन समजतं. सरतेशेवटी त्यांची कारकीर्द मोठी आहे, अनुभव ही मोठा आहे. त्या अनुभवातुन त्यांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलेले आहेत, आता यातुन वाचकांनी जे महत्वाचं आहे ते घ्यावं एवढचं. त्यांच्या आभ्यासातुन त्यांनी कश्मीरची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय. सरकारने त्याकडे खरचं लक्ष देणं गरजेचं आहे. कश्मीरला भारताचा आविभाज्य भाग बनवायचा असेल तर, त्याला भारताशी जोडणं अतिशय महत्वाची बाब आहे. नुसतं ‘कश्मीर हामारा अतुट अंग है’ म्हणुन चालणारं नाही, त्यांच्या गरजा जाणुन त्यांना आपलंसं करणं तेवढचं महत्वाचं आहे.

Without resolving Kashmir dispute, lasting peace cannot be ...

#71.कश्मीर-एक पश्चातापाची भुमी

भाग-1

Heavenly Kashmir Holiday | Jammu Kashmir Tour Package | KashmirLuxury Kashmir & Jammu Holidays & Tailor Made Tours 2020/21 ...

‘कश्मीर’ हे कादंबरीचं नाव बघुन मला कुठली तरी प्रेम कहानी किंवा कश्मीरबद्दल नक्कीच काहीतरी रोमांचक असं वाचायला मिळेल अशी आशा होती. त्याच्यापुढे लहान अक्षरात लिहीलेलं THE LAND OF REGRETS हे मी वाचलचं नव्हतं. जेव्हा सुधा मुर्थी आणि महानायक यांच्या कादंबर्‍या संपवुन वाचणासाठी कश्मीर ही कादंबरी हातात घेतली, तेव्हा नजरेत आलं पुर्ण नाव. धरतीवरचा स्वर्ग, पश्चातापाची भुमी कशीकाय असु शकेल? मी वाचनाला सुरुवात केली, लेखक हे माजी आय.ए.एस ऑफीसर आहेत. त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत आलेल्या अनुभवाचा हा भांडार आहे.

Kashmir's former Chief Secretary touches on the state's issues in ...

त्यांच्या काळात म्हणजेच 1988 ला कश्मीर येथे त्यांची बदली झाली, किंबहुना ती जबरदस्ती करण्यात आली होती. त्यानंतर तिथला अनुभव त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंदवला होता. कश्मीरमध्ये मागच्या 300-400 वर्षात राज केलेल्या राज्यकर्त्यानी, मग त्यात औरंगजेब, शहाजान, अब्दाली, पंजाबचे सिख किंवा इंग्रजांचा क़ाळ असो.  तिथल्या प्रजेचा छळ हा प्रत्येकांनी केला, नागरीकांना काय हवं? त्यांच्या गरजा काय? एक शासन चालवताना अन्न, वस्त्र, निवारा हा प्रजेला मिळतोय का? याची चिंता कोणत्याचं राज्यकर्त्याला नव्हती हे समजतं. देश स्वतंत्र्य झाल्यापासुन अनेक मंत्री, राजनेते यांच्याकडुनही त्याचं पध्दतीची कार्यशैली बघायला मिळतेय. फक्त उन्हाळी ऋतुत कश्मीर गाठायचं, फिरायचं, मौज, मजा करायची. सरकारी नौकरदार, नेते यांच्यासाठी असलेल्या मोफत सोयीचा पुरेपुर आनंद लुटायचा आणि परत भारतात परतुन यायचं. एवढंच सर्वांनी केलेलं निदर्शनास येतं.

Two Roadmaps for Kashmiri Democracy - Inquiries Journal

लेखकाची मुख्य सचिव म्हणुन कारकीर्द सुरु झाली, तेव्हा त्यांच्या पाहणी दरम्यान मदरसामध्ये लहान वयापासुन मुलांचे होतं असलेले ब्रेन वॉश लक्षात आल्यानंतर, याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव तयार केला. शिक्षणसंस्था उभ्या करुन जास्तीत जास्त कश्मीरी मुलांची योग्य घडण करुन त्याना प्रवाहात आणनं आवश्यक होतं, असं त्यांचं ठाम मत होतं. पण त्यांच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने दाद का दिली नसावी? शौचालये, हिवाळी ऋतुत हिमवर्षावामुळे तुटवडा पडत असलेला विजपुरवठा कमी कसा करता येईल यासाठी केलेले अनेक प्रयत्न, जंगलतोड बंद व्हावी यासाठी केलेले प्रयत्न, भ्रष्टाचार्‍याच्या विळख्यात सापडत असलेले कश्मीर वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न, अनेक निसर्ग विरोधी कामांना थांबवण्याचे प्रयत्न. असे अनेक काम लेखकाने एक सरकारी उच्च अधिकारी म्हणुन पार पडल्याचे दिसते. भारत सरकारने कश्मीर राज्याला आपल्या प्रवाहात घेण्याचे प्रयत्न का केले नसतील हा प्रश्न पडतो? लेखकाला त्या काळात तो प्रश्न पडला होता आणि वाचताना आपल्यालाही तो प्रश्न पडतोच.

Tulips Tourism in Kashmir | Wall Street International Magazine

कश्मीरी जनता जेव्हा पाकीस्तान जिंदाबाद बोलतात, तेव्हा ते फक्त भारताला आणि कश्मीरमध्ये तैनात असलेल्या आर्मीला दुखवण्यासाठीचं बोलतात असं रझा यांच्या लक्षात आलं. कश्मीरची बरीच जनता पाकीस्तानकडे का आकर्षित होत आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाकीस्तानद्वारे पाक व्याप्त कश्मीरवर खर्च करत असलेल्या रक्कमेपेक्षा चार पटीने जास्त रक्कम, भारत सरकार खर्च करत होता.  तेव्हा न राहवुन लेखकाने कश्मीरच्या एका मोठ्या समाज कार्यकर्त्यास विचारलं, “जेव्हा भारत एवढा खर्च इथल्या जनतेवर करतोय, तरीही त्यांना पाकीस्तानचं एवढं आकर्षण का आहे?”

तेव्हा त्या कार्यकर्त्याने दिलेलं उत्तर, “रझा साहेब, पाकीस्तानने कश्मीर लगतच्या सर्व गावात खुप सुधारणा केलीय, फक्त इकडच्या लोकांना दाखविण्यासाठी तेवढाचं भाग त्यांनी विकसीत करुन घेतलाय.”

“त्याच्या पुढे जाल तर परिस्थीती कितीतरी वाईट आहे, पण कश्मीर मिळविण्याच्या लालसेपोटी पाकीस्तान इथल्या जनतेला ते गाजर दाखवित आहे.”

पण ती रक्कम आर्मीवर जास्त खर्ची पडतेय आणि तिथल्या जनतेवर मात्र कमी प्रमाणात खर्च होतो. भारत सरकारच्या दुर्लक्षपणाचा फायदा कुठे तरी पाकीस्तान स्वत:साठी करवुन घेतोय हे नक्की आहे.

एका मुख्य सचिवाच्या नात्याने त्यांनी बर्‍याचं आत ग्रामीण भागांना भेट दिली, जिथे लोकांनी त्यांच्या व्यथा यांच्या पुढ्यात मांडल्या. हिम वर्षाव होत असलेल्या काळात, त्यांना अन्नधान्याचा तुटवडा भासतो. त्यांच्यासाठी राज्य सरकारद्वारे पाठविण्यात आलेले धान्य मुळात त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. हे लक्षात आल्यावर तिथल्या अधिकार्‍यावर त्वरीत कार्यवाही करुन अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध करुन देण्याचे काम त्यांनी केले. सरकारच्या प्रत्येक मुख्य सचिवांने अशा पध्दतीची कार्यशैली चालु ठेवणे आपेक्षीत असते. पण तसं होताना मात्र दिसत नाही आणि यांनी सुरु केलेले बरेच काम अपुर्ण राहिले याची खंत ते व्यक्त करतात.

Image result for kashmir village | Village, Natural landmarks, RegionA traditional mountain village in Kashmir Stock Photo: 10960334 ...

जम्मु आणि कश्मीरसारख्या राज्यात  कॉलरा, भुकंप, वणवा, दुष्काळ हे नेहमीचेच येणारे जणु पाहुणे होते. परंतु कुठल्याचं राज्य किंवा केंद्र सरकारने या गोष्टीशी लढण्यासाठी योग्य ते पावले उचलेले नव्हते. त्याकडे किंबहुना कुणाचं लक्षचं जातं नव्हतं, मग राजा प्रजेची काळजी घेत नसेल तर प्रजा बंड पुकारणारंचं ना? लेखक मुख्य सचिव म्हणुन रुजु झाल्यापासुनच्या पहील्या एक वर्षात, सर्व पाहणी करुन एक प्रोजेक्ट सुरु करण्याचा त्यांच्या मानस होता किंबहुना त्या राज्यासाठी ती गरजच होती.

“Core Area Development project” नावाचा हा उपक्रम राबविण्यासाठी सर्व आभ्यास करुन एक प्रस्ताव मुख्य सचिवाने तयार केला. जवळपास 120 करोडचा तो प्रकल्प होता, जेव्हा केंद्र सरकारपुढे हा प्रस्ताव ठेवला गेला. त्यावेळच्या केंद्राच्या कॅबिनेट सचिवाने लेखकाला ऐकवलेले ते शब्द,

“मुसा, आम्ही तुला तिथे सरकारचं दिवाळखोर काढयाला नाही पाठवलं आहे.”

“हा प्रस्ताव माझ्याकडे राहु दे, मी बघतो काय करायचं ते”

या शब्दात यांची बोळवण करुन परत पाठवण्यात आलं, परंतु काही दिवसाने त्या प्रोजेक्टसाठी हालचाल परत सुरु झाली. केंद्राकडुन एक कमीटी सर्व पाहणी करुन गेली, त्यानंतर स्वत: कॅबीनेट सचीव पाहणी करायला आले. त्यानंतर या प्रोजेक्टला मान्यता मिळाली खरी परंतु सचिवाने सख्त निर्देश दिलेले होते.

“की मंजुर झालेला प्रत्येक पै न पै फक्त या प्रकल्पावर खर्च झाला पाहीजे, मला भणक ही लागली गैर वापर होतोय अशी तर हा पुर्ण प्रकल्प रद्द केला जाईल.”

भ्रष्टचाराच्या दलदलीत, स्वत:च्या जोखमीवर हा एवढा मोठा प्रकल्प राबविण्याचं धाडस करायला ते पुढे सरसावले होते. हा प्रकल्प राबवताना लेखकाने केलेले प्रयत्न खरचं कैतुकास्पद वाटतात, लोकांसाठी राबणारे सरकारी अधिकारी फारचं कमी असतात त्यातलेच एक होते मुसा रझा.  भ्रष्ट सिस्टीम, भ्रष्ट नेते, पारीवारीक भलं करण्याची विचारधारा, अशिक्षीत जनता, पदवीधर बेरोजगार युवा यात जम्मु आणि कश्मीर भरडत होतं. याला वाचा फोडण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. To be Continued……………………

Witnessing The 1990 Crisis

#70. कश्मीर

IMG_20180605_143440_HDR

2018 मध्ये हिमालयीन ट्रेक करण्याचा योग आला होता, त्यात माझ्या मनाला वेड लागलेलं ते पांढर्‍या शुभ्र बर्फाच्या पहाडाची. बर्फात खुप खेळावं, मनसोक्तपणे बर्फात आनंद लुटावा असं मनाने ठाणलं होतं. पण आमची ट्रेक बॅच ही अगदीच जुनच्या सुरुवातीस होती, तो पर्यंत अनेक बॅचेस होवुन गेल्या होत्या. उन्हाने बर्फाला हळुहळु नाहीस करायचं सत्र सुरु ठेवलं होतं, त्यात त्या वर्षी हिम वर्षावही फार कमी झाल्याचं समजलं. बेस कॅम्पपासुन जवळपास 7 ते 8 हजार फुट उंचीवर असणारा तो टोक दिसायचा, त्यावर असलेलं जेमतेम बर्फ दिसल्यावर मी मनोमन देवाला प्रार्थना केली, “देवा, प्लीज आमची बॅच जाईपर्यंत बर्फ शिल्लक ठेव.” आमच्या बॅचला पोहचायला अजुन 8 दिवस लागणार होते, मग बर्फ आम्हाला बघायला ही भेटेल की नाही याची भिती माझ्या मनात घर करुन होती.

IMG_20180608_095008

एकदाचे पोहचलो बर्फाचा शोध घेत घेत, पाहतो तर काय अगदीच कमी प्रमाणात बर्फ शिल्लक होता. त्याचा पांढरा शुभ्र रंग सर्वाच्या पायधुळीने काळपट झाला होता. नेमक्या माझ्या वाढदिवसाला मी तिथे होते, त्यातही आम्ही खुप मस्ती केली. आनंद लुटला त्या बर्फात, पण मनाची हाऊस काही पुर्ण झाली  नाही. मग तेव्हापासुन ठरवलं होतं, एक ट्रिप ही हिम वर्षाव होत असताना करायची. पावसासारखा जेव्हा बर्फ पडेल अंगावर तेव्हा कसं वाटत असेल? याचं स्वप्नं मन रंगवत होतं. जाणार कधी अन कशी याची काहीच शाश्वती नव्हती. लग्न जुळलं आणि हनीमुनसाठी म्हणुन आम्ही बरीच ठिकाणे निवडले, त्यात हिवाळी ऋतु असल्याने थंड ठिकाणी जाणं डोक्यात नव्हतचं मुळी. पण ‘मनी वसे तेच स्वप्नी दिसे’ असं काहीसं माझ्या बाबतीत घडलं.

कश्मीरला जानेवारीत म्हणजेच अगदी हिवाळी ऋतुच्या मधात जायचं आम्ही ठरवलं. एकाएकी सगळे चक्र फिरले, केरळ, अंदमान, जयपुर या सर्व ठिकाणांची यादी बाजुला झाली आणि कश्मीरचं बुकींग केलं. जाईपर्यंत मनात एकच धाकधुक, ‘यावेळेत जाणं योग्य राहील का?’ वजावटीत असणार्‍या तापमानात आपण गारठुन जाऊ, एवढे केलेले प्रयत्न वाया जातीलं की काय? याचीचं भिती जास्त. पण बर्फाची ओढ होती ना मनात, त्यात मन मात्र जाम उत्साहीत होतं. श्रीनगरला पोहचलो आणि भर दुपारी कडक थंडीने घेरलं, कश्मीरी नागरीक, त्यांचे थंडीपासुन वाचण्यासाठी घातलेले जाडसर पेहराव, डोक्यावर गोलाकार टोपी आणि सुखलेल्या झाडातील थंड वातावरण.

जाता जाताच डल लेक पाहयला मिळाला, तिथे थांबुन थोडसं निसर्ग डोळ्यात भरुन घेतलं. गरम गरम कांदा भजी आणि पाणी जास्त दुध कमी अशी चहा घेऊन, निरिक्षण करत हॉटेल गाठलं. थंडी काही केल्या कमी होतं नव्हती, आता मात्र मनात पक्कं व्हायला लागलं की चुकीच्या वेळेत आपण या स्वर्गात आलोय. सगळीकडे भकास, अक्षरश: पाने नसलेली झाडे, राजस्थानातील वाळवंटाच्या झाडाची आठवण यावी अगदी तसेच. पर्यटक अगदीच तुरळक प्रमाणात असल्याने, सगळे रस्ते शांत आणि रिकामे होते.

पहीला एक दिवस फिरुन झाला, दुसर्‍या दिवशी फिरुन परत हॉटेलला येताना हिम वर्षाव सुरु झाला. मी स्वत:ला रोखु शकलेच नाही, कापसासारखा बरसणारा पांढरा शुभ्र बर्फ अलगद अंगावर पडत होता. कसली भारी फिलींग होती ती, त्या भावना शब्दात व्यक्त करणं आवघडच आहे. परत हॉटेल गाठेपर्यंत बर्फाने सर्व ठिकाणी ताबा घेतला होता, विद्युत पोल असो, तारा असो, बसण्याचे बाक असो, घराचे छप्पर असो, दुकानासमोरील खुली जागा असो, ओसाड, उजाड वाटणार्‍या झाडांची एक न एक फांदी बर्फाच्या कुशीत होती.

सकाळी ओसाड वाटणारी तिचं वृक्ष, बर्फाने माखल्यावर कसली सुंदर भासत होती. डिसनी लॅंड मध्ये दाखवतात तसचं चित्र माझ्या नजरे समोर होतं. कश्मीरला धरतीवरचं स्वर्ग का म्हणत असतील याची खात्री पटली आणि माझी बर्फाची हाऊस पुर्ण झाली ती कश्मीर ट्रीपमुळे. ही ट्रीप काही चुकीची ठरली नव्हती, मनात कश्मीरची ही आठवण कायम राहीलं.

पण या सर्वात बर्‍याच गोष्टी खटकत होत्या, थंडीचे दिवस असल्याने जवळपास बरीच जनता कामावीण बसुन  होती. तरुण पोरं असेच गल्लीत, गावात, बाजारात हुंदडत असल्याचं दिसलं. शेतात पिक या काळात येत नसल्याने कोणाकडे काहीच काम नव्हतं , “मग हे 6 महिने उदरनिर्वाह कसं करत असतील?” हा प्रश्न मनात येत होता. प्रत्येक गल्लीच्या कोपर्‍यावर, चौकात, बाजारात, दुकानासमोर, रस्त्यावर बघावं तिथे अर्मी उभी होती. अगदी हातात रायफल गन घेऊन, त्यांना बघितल्यावर आम्हालाचं किती भिती वाटली. अगदीच प्रत्येक पोस्टवर होणारी चेकींग, सतत असा जागता पाहरा घेऊन इथे लोकं जगत कसे असतील? हा प्रश्न मनात येत होता.

IMG-20190107-WA0147

मागच्या 70 वर्षात इथे विकास का झाला नसेल? इथल्या नागरिकांना उद्योग, नौकर्‍या का उपलब्ध करुन दिल्या नसतील? कश्मीर आपला भारताचा अविभाज्य भाग मानणारे आपण, या स्वर्गाला भारताशी जोडण्याचा प्रयत्न का करण्यात आला नसेल? खेचर घेऊन पर्यटकासोबत काही पैशासाठी फिरणारे 10-12 वर्षाचे पोरं, काही वृध्दही पाहीले. थोड्या पैशासाठी यांना किती ते कष्ट सहन करावे लागतात याची सल मनात टोचत होती. का सरकार लक्ष देत नसेल? शहरात ही आवस्था तर खर्‍या ग्रामीण भागात काय परिस्थीती असेल?  त्यात आमच्या गाडीचा ड्रायव्हर किती कोपलेला होता अर्मीवर, अर्मीचे काही लोकं कसे अन्याय करतात हे समजावुन सांगण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही ही त्याला सकरात्मक दृष्टीने समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला पण खरचं तो सांगतोय ते सत्य असेल तर?

असे एक सोडुन अनेक प्रश्न मनात घेऊन, अविस्मरणीय आठवणी सह आम्ही परतलो. त्यानंतर भावाने भेट दिलेल्या पुस्तकातील एक कांदबरी होती मुसा रझा यांची, “KASHMIR- THE LAND OF REGRETS” नाव वाचल्यावर मनात एक नकरात्मक भावना आली, का असं नाव दिलं असेल या लेखकाने? लॅंड ऑफ रिग्रेट्स, पश्चातापाची भुमी? कश्मीर तर स्वर्ग ना, मग असं नाव देण्यामागचं कारण काय असेल? याचं विचाराने मी ही कादंबरी वाचायला सुरुवात केलीय. बघु मग यात लेखकाचं, कश्मीरबद्दलच कोणतं मत. कोणता दृष्टीकोन समोर येतोय………

18e61de0-7426-4c34-ab6e-1a8878bbfeda

#69. इरफान खान

Film actor Irfan Khan dies at 54

त्या एका बातमीने आजचा दिवस हा खुप म्हणजे खुपच वाईट ठरला. किती वेळ तर विश्वास नव्हता बसत, मनोमन प्रार्थना करत होते की खोटी असावी बातमी. पण पचवायला कितीही भयंकर असले तरी काही सत्य गळी उतरवावेच लागतात. यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम, या बॉलीवुडमध्ये कुणी गॉड फादर नसताना स्वत:चं एवढं नाव कमावणं साधी गोष्ट नाहीये. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार अशा किती तरी पुरस्काराने त्यांच्या कामाचं आलेख उंचावत गेलं.

Irrfan Khan Returns: A Look at the Actor, the Winner - Dishopedia

प्रत्येक सिनेमात सहजसुंदर अभिनय करुन आमच्यासारख्या चाहत्यांना भुरळ पाडणारे इरफान खान कायमचे हे जग सोडुन गेले. किती विचित्र ती बातमी, कोणाला अशी बातमी द्यावी तरी कशी वाटली असेल? परत कधी त्यांना ऑन स्क्रीन बघताच येणार नाही? त्यांचा अभिनय, त्यांचं कौशल्य आम्हाला बघायलाच भेटणार नाही?  विश्वास बसत नाहीये, मनात जे दु:ख अनुभवतेय ते खरचं शब्दात व्यक्त करणं शक्य होत नाहीये. देव असा का करत असेल हा प्रश्न पडतोय. नुकतीच चार दिवसापुर्वी त्यांची 94 वर्षीय आई गेली आणि लगेच हे पण गेले. ते ही अशा काळात जेव्हा कुणी बघुच शकत नाही, शेवटचं दर्शन ही घेऊ शकत नाहीत.

Pranab Mukherjee giving award to Irrfan Khan | Koimoi

कसलं क्षणभंगुर आयुष्य आहे आपलं, पैसा, आडका सर्व असुनही, भरपुर संघर्ष करुन मिळालेले हे यश त्यांना जगायला भेटलं नाही. नुकताचं लॉकडाऊनमध्ये त्यांचा आलेला नवीन सिनेमा बघितला होता, चंपक बंसल बनुन जो त्यांनी अभिनय वठवला ते विसरणं शक्यच नाही. या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी केलेली एक क्लिप व्हायरल होतेय, ती ऐकुन वाटतं कुठेतरी याची जाणीव त्यांना होतीच. त्यांना आजार झालाय हे कळल्यावर लिहीलेली ती हृदयद्रावक पोस्ट आजही मनात घर करुन आहे. धैर्याने लढा देऊन ते आजारावर मात करत होते, मी नेहमीच मनापासुन प्रार्थना करायचे त्यांच्यासाठी. पण असं काही होईल स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या आजारात असतानाही केलेला सिनेमा शेवटचा ठरला तो अंग्रेजी मिडियम, त्यातही जिव ओतुन अभिनय त्यांनी केलेला आहे. भरुन न निघणारं हे नुकसान फिल्म इंडस्ट्रीचं आणि चाहंत्याचं ही झालं आहे.

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास या दु:खातुन बाहेर निघण्यास, या परिस्थीतीशी झुंज देण्यास अपार शक्ती देवो हीच इश्वर चरणी प्रार्थना.

पण शेवटच त्यांना सांगावंस वाटतयं, “खुप लवकर गेलात सर तुम्ही, अजुन थोडंस लढलं असतं, थोडसं धैर्याने या आजाराशी दोन हात केले असते फक्त आमच्यासाठी. त्या लढ्यासोबत नशीबाने साथ द्यायला हवी होती, फक्त थोडीशी साथ. तुमचं काम आणि तुमची आठवण सदैव या हृदयात राहील.”

Will forever be in our hearts: Fans mourn death of National Award ...

 

#68. साखरझोप

Mercy Minute: New Sleep Numbers - Williamson Source

दुसर्‍या दिवशी शनिवार होता, सगळ्यात प्रिय झोप घेण्याचा सुट्टीचा दिवस. अगदीच अंग ताणुन त्या बेडवर अंथरुणात घुसलं की सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत बाहेर यायचं नावचं नाही. त्यात निखीलराव नव्हता, तो भल्या पहाटे उठुन बडोद्याला ऑफीस कामासाठी जाणार होता. ना नाश्ता, चहा-पाण्याची चिंता होती, ना कुणी झोप मोड करायला राहणारं होतं. फक्त मी आणि माझी झोप एवढंच काय ते शिल्लक. मन तर विचारानेच किती खुश झालं, उद्या खुप झोपायला मिळेल या विचाराने जणु नाचायलाच लागलं. सकाळी 6 वाजता मला न राहवुन जाग आली, अर्धवट डोळे उघडुन मी खिडकीतुन बाहेर नजर टाकली. तेवढ्यात एक मन मला म्हणालं, “सुलो, झोप गं अजुन अंधुक अंधुक आहे बाहेर.”

“हो काय? झोपतेच मग” मी आळस देत म्हणाले.

“सुलो, उठ कालच तर नवीन उपक्रम सुरु केलसं आणि आज आळस करतेस होय उठायला?” दुसरं मन म्हणालं.

“काही नाही गं सुलो, झोप तु. कसली मस्त साखर झोप लागते ही.” परत पहीलं मन डिवचु लागलं.

“सुलो, काल किती मस्त थंडी होती, तो लालबुंद सुर्य, त्याची कोवळी किरणे, पक्षांचा किलबिलाट आणि त्यात तुझा व्यायाम होतो ते काय कमी आहे का?” दुसरं मन म्हणालं.

World Sleep Day: Sleeping through the weekend won't make up for ...

दुसर्‍या मनाचं हे वर्णन ऐकुन मला कालचा नजारा आठवला आणि मी खाडकन उठुन बेडवर बसले. 6.20 झालेले, जाऊ की नको? या विचारात परत एकदा ब्लॅंकेट आंगावर घेऊन मी डोळे मिटले. मग नंतर ठरवलं रनींगला जाऊन येते, नाश्ता करते आणि परत झोपते. या विचारावर आमचं एकमत झालं आणि मी चक्क सुट्टीच्या दिवशी रनींगसाठी माझ्या साखरझोपेचा बळी दिला. मागच्या 2 वर्षात असा प्रकार पहिल्यांदा घडत होता. पण मस्त वाटलं त्यादिवशी ही, साखर झोपेचा त्याग वाया जात नसल्याची जाणीव मनाला सुखावुन गेली. शनीवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी साखर झोपेची आहुती देऊन, उपक्रम राबवण्यात मला यश आलं होतं. आता यापुढे किती रवीवार शनिवार किंवा सुट्टीचा दिवस हा खेळ खेळला जाईल ते बघायचय……

10 lesser-known benefits of running

मध्येच एक मोठा सुट्टीचा आठवडा लागला, त्यात आम्ही होळीला पुणे गाठलं. कारण सुट्टी फक्त मलाच होती, निखीलरावांचं पुण्याला क्लाईंट व्हिजीट असल्याने आम्ही जायचं ठरवलं. कोरोना नामक असुर आपल्या देशात पाय पसरत होता. त्यामुळे पुण्यातही बाहेर कुठे न जाता, दादाकडे घरीच थांबलो. एक दिवस सकाळी वॉकींगला गेलो दोघेही, मग त्याच्यानंतर तब्बल 8 दिवसाचा मोठा गॅप पडला. त्यात मला सतत धावणं योग्य असतं का? हा प्रश्न भेडसावत होता. मग मी गुगल करुन सगळी माहिती जमवली, आठवड्यातुन 4 दिवस पळणे अधिक चालण्याचा कार्यक्रम आणि उर्वरीत 3 दिवस योगा वैगेरे करायचं योग्य राहीलं यावर शिक्कामोर्तब झाला.

Free Yoga Classes/Health Compaign – NEET Advisor

काही दिवस योगा करुन, परत रनींगला सुरुवात केली. चक्क त्या दिवशी जवळपास एक कि.मी चा अंतर मी सलग धावले, मला किती बर वाटलं. पण तरी सहजरित्या ते पार नव्हतं केलं आणि तो एक राऊंड न थांबता पुर्ण करायचं माझं टार्गेट होतं. परत दोन दिवस रनींगचा कार्यक्रम सुरु राहीला आणि लॉकडाऊन घोषीत झालं. अधीच उत्साह आणि त्यात दुष्काळात तेरावा महीना लॉकडाऊनचा. आता कधी सुरुवात होईल देव जाणे.

waiting for lockdown to end | Make a Meme

आता मात्र घरातच योगा करते आणि स्वत:ला फिट ठेवण्याचं प्रयत्न करतेय. पण धावण्यात वाढलेली क्षमता बघुन मी सुखावले खरी, परंतु मॅरेथॉनवाली दिल्ली अभि बहुत दुर है!!! याची जाणीव आणि उणीव दोन्ही आहेत मनाला. सो मी प्रयत्न करत राहणारं आहे, एक ना एक दिवस नक्की तो ध्येय गाठण्यात यश मिळेलच याची खात्री आहे. मग मित्रानो तुम्ही कधी करताय अशा वेगळ्या उपक्रमांची सुरुवात.????? फार मज्जा येते, फिट रहा, मस्त रहा….

Basic guide to stay healthy and fit - GOQii

#67.मी हे करु शकते?????

A New Journey Begins | R E F L E C T I O N S

काही अगदीच नवीन करायचं म्हंटल्यावर तर सुरुवातीचे काही दिवस अती उत्साहाने भरलेले असतात. तसाच काही भाग या उपक्रमाच्या सुरुवातीचा होता, झटकुन उठले आणि लागलीच जॉगींग सुट घालुन, शुज घालुन तयार झाले. 6.35-6.40 झाले असावेत सकाळचे, नुकतचं काळोख जाऊन उजेड पसरत होता. दोघेजणही जॉगींग रुटवर पोहचलो आणि निखीलराव माझ्याकडे बघुन म्हणाला,

“इथुन धावत, त्या ब्रीजच्या पलीकडे एवढचं अंतर जायचं आहे. असे दोन राऊंड मी मारतोय मागच्या तीन दिवसापासुन.”

“हो का? बरं चांगलं आहे” मी उत्तरले.

92e41130-54d8-4894-aa22-774318c0beea

मी नजर आणि टाचा उंचावुन अंतर मोजण्याचा वायफळ प्रयत्न केला, अंतर साहजिकच जास्त होतं. पण निर्धार पक्का होता, धावायचं आहे तर आहे. धावायला सुरुवात केली, पहीलं टार्गेट ते ब्रीज होतं जे साधारण आम्ही उभे होतो तिथुन अर्ध्या कि.मी अंतरावर असेल. तेवढं अंतर हळुहळु मी पळु शकेलच, असा माझा भापक अंदाज होता आणि त्याचं अती अत्मविश्वासाने मी सुरुवात केली. निखीलराव फारच नॉर्मल गतीने धावत होता आणि मी ही, पहीले 100 मिटर अंतर फारच सहजरित्या पार केलं. मी स्वत:लाच शाबासकी दिली, मग 200 मिटर अंतर आल्यावर पायात ताण जाणवु लागला. मी स्वत:ला बजावुन सांगितलं,

“सुले, ब्रीज आल्याशिवाय थांबायचं नाहीये.”

89cce1b2-6f69-4690-bbd3-f10f23ae138f

माझी नजर त्या ब्रिजकडे होती आणि ब्रीजही माझ्याकडे उत्सुकतेने बघत असल्याचा मला उगाच भास झाला. 300 मिटर अंतर कसंबसं पार केलं आणि माझ्या पायांनी माझी साथ सोडायला सुरुवात केली.

“सुलो, हमसे और ना हो पायेगा, किसी और के पैर लेले यार. हमे आराम चाहीये, आराम” माझे पाय मला अगदीच कळवळुन अर्जवे करत होते.

मी माझ्या निर्धाराने ब्रिजकडे आणि निखीलकडे बघितलं, निखील माझ्याकडे बघुन “तु करु शकतेस कमॉन!!!” अशी प्रतिक्रीया देऊन मला प्रोत्साहीत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.

“तु जा पुढे आता, माझे पाय दुखताय खुप” श्वास आवरत निखीलरावला सांगितलं. निखील माझ्याकडे अश्चर्याने बघत होता, “जणु अजुन 300 मिटर पण निट पळाली नाहीस आणि लगेच थांबुन गेली?”

मी सांगितलं, “भाई, मेरेको आदत नही है भागने की, बहुत साल होगये इसतर्‍हा भाग कर.”

561fc0b8-6707-4b46-8543-7441e2f7781e

तो सावकाश गेला पुढे आणि मी स्वत:शीच पुटपुटले, “खुप वर्ष कुठे सुलो? तु तर कधी धावलीच नाहीयेस, म्हणे बहुत साल होगये, हाहाहा!” श्वास आवरत धिम्या गतीने चालत एक साईड पुर्ण केलं.

दुसरी बाजु कशी बशी पुर्ण केली आणि जिथुन सुरुवात केली तिथेच जाऊन मी बसले. शाळेच्या त्या एका जागेवर पळणार्‍या सुलोची आठवण झाली, पळण्याची माझी गती बघुन, “मॅरेथॉन अभी बहुत ही दुर है सांभा” असं मी स्वत:शीच पुटपुटले. धावण्याच्या बाबतीत निखीलरावची कॅपॅसिटी चांगलीच आहे हे जाणवलं, 4 कि.मी सलग धिम्यागतीने धावणं, मला कधी जमेल देव जाणे..

 

0a7b4e91-672e-40fc-8a5e-dee15e29255c

पहाडाच्या आडुन सुर्य कुणी हातात घेऊन वरवर येत असल्याचा भास होत होता. या अंधारलेल्या जगाला प्रकाशमय करुन खेळण्यासाठी एक लाल गोळा कुणीतरी सोडत असल्याचा आभास होत होता. हळु-हळु किरणं फेकत सुर्य वर आला आणि लालेलाल असलेला सुर्य आवघ्या 15 मिनीटात पांढरा शुभ्र होवुन दिमाखात किरणे फेकत आमच्याकडे बघत होता. आम्ही ही 10 मिनीटे कोवळ्या सुर्यकिरणात नाहुन निघालो, कमी पडत असलेल्या व्हिटॅमीन-डी ची पुर्तता इथुन नक्की होईल याची खात्री झाली.

128279c3-579b-4824-b379-c052db7278a8

सकाळचा तो थंड, गार वारा अंगाला स्पर्श करताच वेगळी अनुभुती येत होती, धावताना काहीतरी नवीन उत्तेजना शरीराला मिळते. कोवळ्या सुर्यकिरणाचा आनंद काही औरच असतो, पक्षांचा किलबिलाट, अर्ध झोपेत असलेला तो भाग शांत आणि सुंदर भासला. निदान पहील्या दिवशी तरी तो अनुभव आला. बघु आत पुढच्या दिवसात काय अनुभव येतो या जिवाला. किती दिवस ही पायपीट चालतेय.. लेट्स सी………….

Life Quote. Isolated On White Background. Keep Going You Can ...

 

#66.धावं

Girl dreaming of love. The illustration shows a girl who dreams o ...

27 फेब्रुवारीपासुन धावण्याचा नवा उपक्रम सुरु केला. खुप महिन्यापासुन मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याच मानस होता. पण पळण्याचा अनुभव मात्र अगदी शुन्यावर असल्याने मॅरेथॉनचे स्वप्न बघणे कितीसे योग्य होते देवच जाणे. धावायला रोज सकाळी जाऊ यासाठी निखीलरावांच्या मागे लागुन लागुन मी थकले होते आणि थकुन रोज सकाळी धावायला जायचं स्वप्नं हे स्वप्नच राहीलं, याची खात्री झाली होती. पण आता ग्रह फिरले आणि कोणा एका भल्या कारणासाठी आम्ही सुरुवात केली. तसं धावण्याचा आणि माझा विशेष असं शाळेत असल्यापासुनच जमायचं नाही. एक किस्सा मला आजही आठवतो, शाळेत दरवर्षी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर खेळाच्या सर्व स्पर्धा व्हायच्या. त्यात कब्बडी, खो-खो, पळणे, लांब उडी, उंच उडी, भाला फेक, थाल फेक, रिले हे खेळ आर्वाजुन व्हायचे.

naina school comes first in kabaddi, in kaithalKho-Kho: A Popular Game In Schools - Beyond Pink World

Reports on Neelbagh Rural Residential School - GlobalGivingइस लड़के ने लंबी कूद में कमाल कर दिया ...In A College In Bangkok, School Children In Outdoor Sports Court ...

शाळेच्या ग्राऊंडवर सराव केला जायचा, चांगल्या खेळणार्‍या मैत्रणींना सरांकडुन मिळणारी वाहवा आणि वर्गात मिळणारं अटेंशन बघुन माझ्या मनात विचार चक्र सुरु झालं,

“सुलो, चल तु पण असं काही तरी तुफानी करं, म्हणजे तुला पण हे सगळं मिळेल.”

“मना, मला जमेल का रे यातलं काही?” मी स्वत:वर संशय घेत विचारलं मनाला.

“का नाही जमणारं? आभ्यासात तर आहेसच हुशार, पण थोडी खेळात पण दाखव तुझी कसब.” मन अत्यंत निर्धाराने बोललं.

मनाच्या या भुरळयुक्त बोलण्याणे मी प्रभावीत झाले आणि हळुच का होईना पण हरबर्‍याच्या झाडावर चढुन बसले. खेळ स्पर्धा सुरु झाल्या तशा मी अशोक गुरुजीकडे गेले,

“गुरुजी, गुरुजी मला पण रनींगमध्ये भाग घ्यायचा आहे” मी उत्साहीत होवुन बोलले.

तसं गुरुजीं माझ्या चेहर्‍यावरचे न कळणारे भाव टिपत एक स्मीत हास्य देत म्हणाले, “तुला भाग घ्यायचाय? जमेल का पळायला?”

“हो गुरुजी, जमेल”  मी अजुनच अत्मविश्वासाने सांगितलं.

Conversation Between Teacher And Student Clipart

जणु गुरुजींना विश्वास नव्हता की मी पळु शकेल, पण तरी त्यांनी माझं नाव नोंदवुन घेतलं. स्पर्धेचा दिवस उगवला 100 मीटर होती की 200 मीटर काही आठवत नाही, पण ती धाव स्पर्धा याच्यापेक्षा नक्कीच जास्त नव्हती. सर्व स्पर्धक एका पांढर्‍या रेषेअलीकडे उभे होते, धावण्यासाठी हिरवा कंदील मिळण्याची वाट बघत. एकदाची शिट्टी वाजली आणि सर्वजण धावायला लागले. मी पण जिव तोडुन त्या फिनीश लाईनकडे वाघिणीसारखी बघत, झडप मारण्याच्या प्रयत्नात धावायला लागले. मी धावतेय, धावतेय इतक्या जलद गतीने की कोणत्याही क्षणी ती लाईन क्रॉस करुन जाईल.

Girl Running Scared Stock Illustrations, Images & Vectors ...

पण तेवढ्यात मागुन गुरुजींचा आवाज आला,“अगं सुलोचना पळ जोरात, किती हळु पळतेय.”

गुरुजींचे वाक्य ऐकुन मी एक आश्चर्ययुक्त नजर त्यांच्याकडे फेकली आणि मनाशीच पुटपुटले,

“हायला, मी इतक्या फास्ट पळतेय, गुरुजींना हळुच का वाटत असेल?” मी परत अजुन गती वाढविण्याच्या प्रयत्नात लागली. पण गुरुजींचा परत आवाज आला,

“तुला बोललो होतो, जमेल का? बघ ती अर्चना पोहचली पण तिथे.”

मी पुढे नजर टाकेपर्यंत पहीले तिन विजेते लाईन क्रॉस करुन उभे होते.

“हे काय होतय, मी इतक्या जोरात पळुनसुध्दा अजुन इथेच का?”

A Little Girl Running Away From Something, Looking Over Her Shoulder

“ती कसंकाय पोहचली तिथे? कसंकाय? कसं काय???” मी स्वत:ला प्रश्नच प्रश्न विचारले.

पण त्याचा काही उपयोग नव्हता. मी तिथेच उभी राहुन श्वास घेण्याचा प्रयत्न केला.

“एखाद्या भयंकर स्वप्नात आपल्या मागे लागणार्‍या भुताला बघुन, आपण लाख जलद गतीने पळत जरी असलो तरी एकाच ठिकाणी उभे राहुन धावत असतो” अशीच काय स्थिती माझी तिथे झालेली.

Girl Running Away Clipart

काही केल्या माझ्या गतीचा आणि माझा एका विचारावर एकमत होत नव्हतं. गुरुजींकडे बघुन पराभावाची एक स्माईल देत मी तिथुन काढता पाय घेतला. तेव्हा पासुन धावणे आणि मी कधी संबंध आलाच नाही, किंबहुना मी येऊच दिला नाही.

पण आता मनाने हट्ट धरलाय तो मॅरेथॉन पळण्याचा, त्याबद्दलही सविस्तर माहिती गुगलवर वाचुन 3 ते 6 महिने सराव लागतोच यावर माझा शिक्कामोर्तब झाला. निखील आणि मी आता धावायला तर लागलोय पण मॅरेथॉनसाठी म्हणुन तर मुळीच नाही, फक्त फिट राहण्यासाठी. पण यात माझ्या मनाची ती इच्छाही पुर्ण होईल का हे वेळेच सांगेल. या शर्यतीत मी किती दिवस सकाळच्या साखरझोपेचा त्याग करुन धावायला जाणार आहे? माझी ती शाळेची गती मला आता परत अनुभवायला मिळेल का? मी सत्यात किमान 300-400 मिटर तरी सलग पळु शकेन का? काय होईल नेमकं या नवीन प्रवासात सध्या मला तरी काहीच माहित नाही.

Fitness Motivational Quotes | Fitness motivation quotes, Fitness ...

हा ब्लॉग मार्च महिन्यात लिहीलेला आहे, आता मी धावायला जात नाही. घरीच योगाचा कार्यक्रम सुरू आहे… गैरसमज नकोत म्हणून सांगितलं, नाहीतर पुलीस मला शोधत यायचे..

#65. लॉकडाऊन

कोणाच्या उभ्या आयुष्यात ही गोष्ट घडेल असं वाटलं नसेल. निरंतर धावणारं जग असं एकाएकी स्तब्ध  होईल, बंद होईल, थांबुन जाईल? कुणी ही कल्पना बोलुन जरी दाखवली असती की, निसर्गासाठी एक दिवस पुर्ण भारत बंद असला पाहीजे. तर त्या व्यक्तीवर किती हसलो असतो आपण??

Similar Images, Stock Photos & Vectors of Cartoon illustration of ...

“पुर्ण देश 24 तास बंद ठेवणं शक्य तरी आहे का? किती नुकसान होईल सर्वांचं, देश मागे पडायला वेळ लागणार नाही”.

“मी लिहुन देतो की, या जगात असं करणं कोणालाचं शक्य होणार नाही. स्वत: देव जरी आला तरी हे जग थांबु शकणारं नाही.”

असं साहजिकचं प्रत्येकाचं मत असतं, देशाचं काय अन गावाचं काय, मला तर मी स्वत: शांत, निवांत कुठे थांबु शकेल की नाही असचं वाटायचं. कोरोना हे जैविक अस्त्र असो वा अजुन काही, पण आज आख्खं जग थांबलंय. त्याला थांबावचं लागलं, थांबन्यावाचुन कोणाकडे काही पर्याय निसर्गाने ठेवलाच नव्हता.

Lockdown Stock Illustrations – 3,474 Lockdown Stock Illustrations ...

निसर्ग स्वत:ची जखम भरवुन घेण्यासाठी आज सगळ्यांना थांबवतो आहे. या मनुष्यरुपी प्राण्याने जे घाव केलेत, स्वत:च्या सुखासाठी निसर्गाला आणि निसर्गाने जन्म दिलेल्या प्रत्येक जिवाला जखम झाली होती. निसर्गाने प्रत्येकाला घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन मनुष्य प्राणी आपले वर्चस्व गाजवु पहात होतं. पण या काही दिवसाच्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे घाव भरत असल्याचे अनेक चिन्ह दिसताय.

मनुष्याने प्राण्याची, पक्षांची जागा घेऊन त्यांना पिंजर्‍यात अडकवलं. त्यांचं स्वातंत्र्य हिरावुन, त्यांचं आयुष्य बंदीस्त करुन टाकलं होतं.

Zoos | Animals Are Not Ours to Use for Entertainment | PETA UKZebras, lions, kangaroos among exotic animals seized at Quebec zoo ...China: Online Outcry Over IPO Plans for Bear Bile Company

orangutan (Pongo pygmaeus), two animals in a cage, schauen durch ...

आज निसर्गाने अगदी आपल्यालाच बंदीस्त करुन टाकलं, त्याची जाणिव तरी किंबहुना सर्वांना आतापर्यंत आलीच असेल. प्राण्यानां पिंजर्‍यात बसुन काय सहन करावं लागत असेल, त्यांच्या पिंजर्‍यात असतानाचे केवीलवाण्या चेहर्‍यावरचे भाव आता आपल्याला कळले असतीलच.

images (19)

बर्‍याच शहरात चक्क रस्त्यावर, मोर, बदक, हत्ती, हरीण, भालु असे अनेक पक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करतांनाचे छायाचीत्र पहाण्यात येत आहेत. ते बघुन मनात प्रश्न उद्भवतो आहे, की किती अन्याय केलाय आपण या प्राण्यावर? पक्षांवर? मुक्तपणे विहार करण्याचा त्यांना अधिकारच ठेवला नाही, आपण अहोत तरी कोण असे करणारे.?

Herd of deer not lounging on Ooty-Coimbatore road amid coronavirus ...Pictures of animals moving freely during lockdown will surely ...

Peacocks Dance on Mumbai Streets: Amid Lockdown Peacocks Take to ...

आज समुद्रात कधी न दिसणारे डॉल्फीन खुशीत मस्ती करताना दिसतात. अनेक प्राणी जिवानां हा प्रश्न पडत असावा, नेमके हे सर्वजण गेले कुठे असतील? आज 8-10 दिवस झाले सगळं कसं मोकळं मोकळं आहे. किंबहुना याचा त्यांना आनंद हा अधिक झाला असेल, आपण परत त्यांचं स्वातंत्र्य हिरावुन घ्यायला येऊच नये अशी प्रार्थना ते नक्की करत असतील.

Schools Of Dolphins Return Near Marine Drive Thanks To Drop In ...

वर्षानुवर्ष मानव जातिची घाण वाहणार्‍या नद्यांनाही याचा उपयोग होताना दिसतोय. गंगा, नर्मदा, यमुना सारख्या मोठ्या नद्याही शुध्द होताना पाहण्यात येतय. सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत होतं नदी स्वच्छ करण्यासाठी, ते ही मागच्या 7-8 वर्षापासुन. पण आज आवघ्या काही दिवसात ते काम निसर्गाने स्वत:हुन करवुन घेतलं. स्वच्छ करणारी मनुष्य जात, घाणही तेवढ्याचं मोठ्या प्रमाणात करायची. मग नदी स्वच्छ होणं शक्य होत का?

Water quality of Indian holy rivers improve amid lockdown ...COVID-19 impact: Delhi's Yamuna River undergoes makeover, looks ...

अगदीच दुषीत झालेलं वातावरण, काही ठरावीक शहरे मेटाकुटीला आलेले.  त्यांच्या पुढे प्रदुषण हा आसुरासारखा आ$$$$ आसुन उभा होता. त्यावर कितीतरी दिग्गजानी चर्चा केली असेल, सत्तेवर असलेल्या राजकारण्यावर  टिकास्त्र फेकले गेले. वाद-विवाद झाले, पण उपाय कोणाकडेच नव्हता. प्रदुषण करणारी मनुष्य जात कुठे, किंचतही थांबायला तयार नव्हती. पण निसर्गाने या काही दिवसात जे शक्य नव्हतं आणि अगदीच आवश्यक होतं ते स्वत:हुन करवुन घेतलं.

India coronavirus: Lockdown brings clean air and blue skies - The ...People in India can see the Himalayas for the first time in ...

मित्रांनो आता तरी लक्षात घ्या आपल्याला जसं जगणं हवहवसं वाटतं, तसचं प्राण्यांनाही वाटत असेल. निसर्गाच्या उदरात वाहणार्‍या या नद्या स्वच्छ आणि निर्मळ राहावेत, त्यांचं पात्र कधी सुंदर असावं असं त्या नद्यानांही वाटतं असेल, मुक्तपणे वावरणारी हवा तिला ही कधी तरी मोकळा श्वास घ्यावासा वाटत असेल.

Air quality improves amid lockdown in India - YouTube

मग या आलेल्या महामारीतुन ही शिकवण नक्की घेतली पाहीजे, की आपल्या वाचुन हे निसर्ग चालु शकतं, दुनीया चालु शकते, आपल्या बापाचं इथे काहीच नाही. सर्व निसर्गाने दिलेलं आहे आणि निसर्गाच्या मालकी हक्काचे आहे. त्यात खरेदी विक्री करायला आपल्याला हक्काचं नाहीच मुळात, एका भाडेकरुसारखं इथे राहुन, जे निसर्गाचं आहे ते निसर्गाला वाहुन आपल्याला परत जायचं आहे. हे ध्यानीमनी रुजवुन यापुढे जगता आलं पाहीजे.

महीन्यातुन निदान एक दिवस तरी असा लॉकडाऊन पाहीजेच, निसर्गासाठी. बघा जमतय का आणि पटतय का?

Lockdown impact on economy and market: How will India lockdown ...

#64. कोरोना आणि घर

 

 

Indian Mom And Dad Clipart

मी नेहमी घरी गेल्यावर आईचा आणि माझा ठरलेला संवाद असतोच, “सुलु तुला काय देऊ माय बांधुन?” मी अगदी गेलेल्या दिवशीच आईचा हा प्रश्न असतो.

“आई, हाय का आता? आजच आले मी आणि तु लगेच जायचा विषय काढतेय.” मी थोडीशी त्रासीकपणे आईला बोलायचे.

“नाही गं बटा, जाताना ध्यानात राहत नाही. काय घेवावं अन काय नाही हे कळत नाही.” आई समजावुन सांगत म्हणायची.

मी सोबत आणलेली सामानची यादी आईच्या हातात देत म्हणायचे, “एवढं काय सध्या तर नाहीये बघ, बाकी आठवलं तर सांगते मी.”

In Three New Animated Cartoons, Indigenous Characters Are The ...

आई दुसर्‍या सेकेंदाला सगळं सामान वाचुन, बान्धायला सुरुवात करायची. अर्ध्या पाऊण तासानंतर परत म्हणायची, “हे बघ, सगळं बांधुन तुझ्या बॅगजवळ ठेवलयं. यादीनं टाक बॅगेत, तुला विसरुन जायची सवय हाय एकतर.”

मी होकार्थी मान डोलवायची आणि बाकीचे दिवस मस्त निवांत राहयचं हे ठरवायची.

थोड्या वेळाने आई परत यायची , “सुलु, थोड्या शेवय्या बांधुन देऊ का गं?”

“अगं आई, नको देऊस” मी म्हणायचे.

“माय, घरी केलेले हाईत शेवय्या. कधी ऑफीसवरुन आल्यावर कट्टाळा आला की पटमन थोड्या फोडणीच्या शेवय्या करुन खायच्या.” आई समजावत म्हणायची.

Narayani Shevaya - Food Products Supplier in Kolhapur

“अगं मागे एकदा दिली होतीस तेव्हा खायचं लक्षातच नाही आणि त्या खराब झाल्या सगळ्या. तु दिलेलं सामान एक तर टाकु वाटत नाही आणि खराब झालं की खावु वाटत नाही.” मी केवीलवाणा चेहरा करत आईला सांगायचे.

“उग, पसाभर टाकते, लई देत नाई मी.” आई शेवटी थोडे का होईना बॅगेत भरायची आणि तिच्या प्रेमापोटी मला नाही म्हणन जमायचं नाही. यावेळेस मात्र मी तिला टाकु दिलं नव्हतं आणि आता लॉकडाऊन मुळे त्या शेवय्याची किती आठवण येतेय काय सांगु? पसाभर का होईना आणल्या असत्या तर बरं झालं असतं असं राहुन राहुन वाटतयं.

शेवई उपमा - Sevai upma | चकली

शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची चटणी खास उखळात वाटलेली, ते ही तिच्याच हातची आम्हाला सर्वांनाच फार आवडते. उखळात वाटणं म्हणजे फार आवघड काम वाटतं आम्हाला तरी, पण ती फार आवडीने आम्ही गेल्यावर शेंगदाण्याची आणि जवसाची चटणी वाटुन देते. ती आज लॉकडाऊनच्या काळात किती गोड भासली मला. छोटुश्या डब्यात दोन्ही चटण्या थोड्या थोड्या शिल्लक आहेत. रोज अगदी कमी प्रमाणात मी खाते, खाताना मनात आईची आठवण घोळत असते.

घरी बनवलेले  चिप्स पापड,  लोंच, मुग डाळ, उडीद डाळ जेव्हा ती आवार्जुन देते आणि मी घेण्यास नेहमीच टाळाटाळ करते. आता वाटतय खरचं आईने हे दिलं नसतं तर? आईने बळजबरी आख्खे मुग टाकले होते, त्यातही मी मात्र नकोचा सुरू लावून होते. त्याचं मुगाची उसळ आणि भाजी आज लॉकडाऊन मध्ये जिभेला किती चव देतेय.

त्याचं प्रकारचं सासरही लाभलं, सासरी गेल्यावरही बरीच मोठी यादी घेऊन जाते. त्या यादीपेक्षा कितीतरी जास्त सामान मम्मी भरुन देतात. त्यात घरच्या शेतातील कांदे, लसुन, लोंच, मठ, दाळी, कितीतरी प्रकारचे पापड(चिकनी, तांदळाचे पापड, नागलीचे, उपवासाचे पापड, कुरडई, चिप्स इ.).

papad

 

“हे बघ सुलोचना, यात आंब्याचं लोंच आहे.” एकदम व्यवस्थीत पॅक केलेला डबा हातात देत मम्मी म्हणायच्या.

“हा तुपाचा डब्बा, घरी बनवलेलं तुप आहे.” अजुन एक पॅक डब्बा पुढ्यात सरकवला जायचा.

“मम्मी घरी राहुद्या ना थोडसं तुप, सगळचं का देताय आम्हाला?” तुपाचा मोठा डब्बा बघुन मी म्हणायचे.

“नाही गं, मी बनवतेच की अजुन तुप. तुम्हाला भेटत नाही खायला तुम्ही घेऊन जा ते.” मम्मी

“अजुन काय पाहीजे तुम्हाला, आठवा बरं” पप्पा सर्व बॅगेत भरत विचारायचे.

मी नकारर्थी मान डोलावली की ते हसुन अजुन दोन चार गोष्टी स्वत: आठवुन बॅगेत टाकायचे. भरलेली सामानाची गोणी बघुन मी निखीलरावला एक बारीक स्माईल द्यायचे. कारण सगळं त्यालाच उचलुन घ्यावं लागणारं होतं. आज नेमकं कांदा संपला घरचा आणि आमची कसली तारांबळ उडाली, कसेबसे दोन तीन किलो कांदे आणुन आमचा उदरनिर्वाह सुरु आहे.

एकच्या ठिकाणी आर्धा कांदा वापरुन सध्या काम सुरु आहे. मध्येच घरच्या दिलेल्या पापडांवर आम्ही ताव मारतो. मम्मीने उपवासासाठी खास माझ्यासाठी बनवलेलं आवळ्याचं लोंच खाताना कोण आनंद होतो. त्यांनी जर बळजबरीने दिलं नसतं तर?आज लॉकडाऊनमध्ये या सर्व गोष्टींची चव खरं सांगायचं तर आता ती अमृताहुनी गोड भासते आहे. नाहीतर गावाकडुन आणलेल्या सामानांची आपल्याला एवढी काळजी आणि महत्वचं कुठे असतं? बाहेरच्या चटोर्‍या, मसालेदार खाण्यापुढे आपल्याला घरुन आणलेलं हे हेल्दी, ओरीजनल अन्न नकोसं वाटतं. गावाकडुन आल्यावर एक डब्यात झाकुन पडलेलं ते धान्य काढुन खायची उसंत आणि आवड दोन्ही नसतात.

घरुन आलेल्या त्या वस्तुंमुळे आज खरंतर बाहेर पडायची आवश्यकताच भासत नाही. घरात असलेल्या या वस्तु खातांना माझ्या आयुष्यातल्या या दोन माऊलींचा चेहरा समोर दिसत राहतो आणि देवाचे मनोमन आभार ही मानते की यांचे वरदहस्त, यांची सावली माझ्या आयुष्यात कायमची आहे आणि राहीलं.

masala

या मसाला डब्यातील मीठ वगळता सर्व गोष्टी घरून आलेल्या आणि घरी बनविलेल्या आहेत. मित्रांनो आपल्या घरून आलेला हा मायेचा ऐवज नेहमी आवडीने जपून खात जा.. त्याची अवहेलना उभ्या आयुष्यात माझ्याकडून तर आता होणार नाही. तुम्ही स्वतः ची काळजी घ्या आणि बाहेर न जाता घरचं मस्त मस्त चवीष्ट जेवण खा… घरी रहा, सेफ रहा….